पुस्तक मागे घेण्याचा प्रश्नच नाही, लेखकाची ताठर भूमिका

भाजपने हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी याबाबतची माहिती दिली (Aaj ke shivaji Narendra Modi book) आहे. 

पुस्तक मागे घेण्याचा प्रश्नच नाही, लेखकाची ताठर भूमिका
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 4:16 PM

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा प्रचंड चढला (Aaj ke shivaji Narendra Modi book) होता. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत होते. राज्यातील अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. यानंतर अखेर भाजपने हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पुस्तक मागे घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही अशी भूमिका या पुस्तकाचे लेखक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी घेतली (Aaj ke shivaji Narendra Modi book) आहे.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिले आहे. भाजपने बॅकफूटवर जात वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्याचं बोललं जात होते. मात्र अद्याप हे पुस्तक लेखकाने मागे घेतलेले नाही. त्यामुळे या पुस्तकाचा वाद नेमका कधी मिटणार? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

पुस्तक परत घेणार नाही, गोयल यांची प्रतिक्रिया

तर दुसरीकडे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लेखक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पुस्तक परत घेण्यास नकार दिला आहे. “शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदींच्या तुलनेवर पुस्तक परत घेण्याचा प्रश्नच नाही. मी याबद्दल माफी मागणार नाही. तसेच हे पुस्तकही परत घेणार नाही,” अशी प्रतिक्रिया  जय भगवान गोयल यांनी दिली.

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन करण्यात आले होते. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलेच तापले होते. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत असून अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली (Aaj ke shivaji Narendra Modi book) होती.

“मी जितका छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतो, तेवढा सन्मान मराठी लोकही करत नसतील,” अशी प्रतिक्रिया ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लेखक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी दिले होती. “जे लोक पुस्तकावर चर्चा करत आहे. त्यांनी एकदा पुस्तक वाचा. त्यांना उत्तर मिळेल. ज्यांना माझ्याविरोधात आरोपपत्र दाखल करायचे आहे. त्यांना सर्व अधिकार आहे,” असेही गोयल यावेळी म्हणाले होते.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी या पुस्तकावर माजी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांना हे मान्य आहे का? असा सवाल केला होता. त्यावरुन संभाजीराजेंनी ट्विट करुन, थेट उद्धव ठाकरेंना संजय राऊतांच्या जिभेला लगाम घालण्याचा सल्ला दिला होता.

संबंधित बातम्या : 

चिडचीड करण्यापेक्षा राजीनामा देऊन भूमिका घ्या, संजय राऊतांचा संभाजीराजे, उदयनराजेंना सल्ला

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर छत्रपती शिवेंद्रराजे म्हणतात…

…ते मराठी लोकही करत नसतील, वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाची पहिली प्रतिक्रिया

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.