खैरैंचे एकाहून एक आरोप, सत्तारांचं प्रत्येक मुद्द्याला जशास तसं उत्तर, मायनस झिरोचीही उपमा! पाहा…
खैरैंच्या आरोपाला सत्तारांचं प्रत्युत्तर, पाहा काय म्हणालेत...

औरंगाबाद : चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. हे दोन नेते एकमेकांवर सडकून टीका करत असतात. आताही चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. तर सत्तार यांनीही त्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. व्हायरल व्हीडिओ, जमिनी हडपण्याचा विषय, गाडण्याची भाषा झिरो दर्जाचा नेता, यासह अन्य मुद्दे या दोघांच्या भांडणात चर्चेत आलेत.
शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अशा कृषीमंत्री सत्तार जिल्हाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरतात. दारू पिण्याची भाषा वापरणं योग्य नाही. अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी टीका केली.
खैरेंच्या टीकेला सत्तारांनी प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत खैरे गंडलेला माणूस आहे. त्यांच्याकडं आमदार-खासदार कुठलंही पद नाही. ते काय मला गाडणार, त्यांना गाडण्याचं काम मीच करणार, असं सत्तार म्हणालेत.
सत्तार म्हणजे हिरवा साप आहे. देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की, असे मंत्री असतील तर सरकारची प्रतिमा खराब होतेय. त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं. त्यांचा राजीनामा घ्या आणि त्यांना हाकलून द्या, असं खैरे म्हणाले.
खैरेंच्या टीकेला सत्तार यांनी उत्तर दिलंय. खैरेंनी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही. पण खैरे म्हणजे बंद दुकान आहे. बंद दुकानाची चर्चा काय करणार? खैरे मायनस झिरो माणूस आहे. झिरो माणसाची काय चर्चा करायची? जनतेतून निवडणून आलेल्या आमदार-खासदारांच्या विधानाची चर्चा केली तर ठीक आहे. पण झिरो माणसाबद्दल काय बोलणार. मी हिरवा साप आहे की काळा ते लोकसभा निवडणुकीत दाखवून देईल, असं सत्तारांनी म्हटलंय.