Eknath Shinde : अब्दुल सत्तार कोणत्याही चिन्हावर निवडून येतील, एकनाथ शिंदे यांना विश्वास, नेमकं काय म्हणाले, मुख्यमंत्री…

अनेक उद्योपतींना मी भेटलो आहे. वेदांता कंपनीने 2 लाख सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणणार आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde : अब्दुल सत्तार कोणत्याही चिन्हावर निवडून येतील, एकनाथ शिंदे यांना विश्वास, नेमकं काय म्हणाले, मुख्यमंत्री...
अब्दुल सत्तार कोणत्याही चिन्हावर निवडून येतील, एकनाथ शिंदे यांना विश्वास
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 11:06 PM

जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात (In Sillod Constituency) होते. जालना लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड येथे विविध विकास कामांचा (Development Works) भूमिपूजन (Bhoomi Pujan) व लोकार्पण सोहळा होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या मतदारसंघातील प्रत्येक माणूस. उपाशी तापाशी आला आहे. आपण आपुलकीनं प्रेमापोटी आले आहात. चांगला आमदार तुम्ही निवडून दिलाय. ते कोणत्याही निशाणीवर निवडून येऊ शकतात. अब्दुल सत्तार कुठल्याही चिन्हावर निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मला एकदा बोलले. मला कुत्रा चिन्ह मिळालं तरीही मी निवडून येईल. कुत्रा हा एक प्रामणिक असतो. असे सगळे सहकारी मिळाले आहेत.

राज्यात 2 लाख सहा हजार कोटींची गुंतवणूक

अनेक उद्योपतींना मी भेटलो आहे. वेदांता कंपनीने 2 लाख सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणणार आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. प्रत्यक्ष काम होणार आहेत. केंद्राची मदत लागणार आहे. केंद्रानी सांगितलं महाराष्ट्रात जेवढे उद्योगधंदे करता येतील, तेवढे करा. काम होत राहतील. काळजी करू नका. कामं करू. केंद्रातील नेत्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं.

जालना-नांदेडसारखा प्रकल्प होतोय

तुमच्यातील एक कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून बसला असल्याचं ते म्हणाले. ही सगळी माणसं जीवाभावाची आहेत. जनतेचा सर्वांगीण चांगलं काम करू. सर्वधर्म समभाव आहे. विकासाची कामं करू. जालना-नांदेडसारखे मोठे प्रकल्प देखील करतोय. त्या माध्यमातून आपल्याला फायदा होईल. कनेक्टिव्हीटी सुलभ करू. या राज्याचा विकास होऊ शकतो. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

फोन करून थेट काम करण्याचा दिला सल्ला

तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यश मिळालंय. अर्जुन खोतकर घरी जाऊन आले. मी तुमच्याबद्दल बोललो नसल्याचं खोतकर यांनी सांगितलंय. मी शिंदे यांच्यासोबत असल्याचं खोतकरांनी सांगितलं. इमोशनल होण्याचा काळ संपला आहे. या राज्यातला शेतकरी सुखी झाला पाहिजे. मराठवाड्यातील आत्महत्या होताच कामा नये, अशाप्रकारचं काम करायचंय. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. जागेवर ताबडतोब निर्णय होत असल्याचं ते म्हणाले. उचलायचं फोन डायरेक्ट काम करायचंय. तरच आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. हे सरकार तुमचं आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.