अभिनेते आशुतोष राणा निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई : राजकीय, सामजिक प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडणारे अभिनेते आशुतोष राणा राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. या चर्चांवर अखेर आशुतोष राणा यांनीच विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून, राजकारणात येणार का, या प्रश्नाचे राणा यांनी उत्तर दिले आहे. “गेल्या काही दिवासंपासून माध्यमांमधून मी 2019 ची […]

अभिनेते आशुतोष राणा निवडणुकीच्या रिंगणात?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : राजकीय, सामजिक प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडणारे अभिनेते आशुतोष राणा राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. या चर्चांवर अखेर आशुतोष राणा यांनीच विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून, राजकारणात येणार का, या प्रश्नाचे राणा यांनी उत्तर दिले आहे. “गेल्या काही दिवासंपासून माध्यमांमधून मी 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे अंदाज बांधले जात आहेत. कुणी म्हणतंय, मी जबलपूरमधून निवडणूक लढेन, कुणी म्हणतंय होशंगाबाद-नरसिंगपूरमधून लढेन, तर कुणी म्हणतंय आणखी कुठल्यातरी जागेवरुन लढेन.” असे म्हणत आशुषतोष राणा यांनी या चर्चांना उत्तर दिले आहे.

शालेय जीवनापासूनच मला राजकारणात रस आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात माझे जवळचे मित्र आहेत आणि ते त्या त्या पक्षात महत्त्वाच्या पदावर आहेत. या मित्रांशी दशकांपासूनची मैत्री आहे. त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवं नाही आणि राजकारणाची चाल, चित्त आणि चिंतन मी चांगल्याप्रकारे जाणतो. अनेकजण अभिनेत्यापासून राजकीय नेते बनलेत, मात्र माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे की, मी नेत्यापासून अभिनेता बनलो आहे. काँग्रेस, भाजपमध्ये माझे मित्र आहेत, मात्र त्यांनी कधीच मला पक्षात येण्यासंदर्भात विचारले नाही आणि मीही त्यांच्याशी कधी राजकारणाशी संबंधित चर्चा केली नाही.” असे आशुतोष राणा म्हणाले.

राजकीय प्रवेशाच्या चर्चा का होत आहेत, हेही अभिनेते आशुतोष राणा यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “या चर्चा होतात, याचे कारण मी अभिनेता असूनही परमपूज्य गुरुदेव दद्दाजींमुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय असतो. या कामांमुळे मी समाजातील विविध गोष्टीत सक्रीय सहभाग नोंदवत असतो. मात्र, राजकारणाशी माझा तेवढाच संबंध आहे, जेवढा लोकशाही देशातील सर्वसामान्य लोकांचा असतो. सर्वसामान्य माणसं विचार आणि मतांबाबत सजग असतो, ज्यामुळे देशाची अखंडता आणि अस्मिता टिकून राहते.”

“भविष्यात काय होईल माहित नाही. मात्र, सध्यातरी मी अभिनेताच आहे. अभिनयात मला आनंद मिळत आहे आणि अभिनयातून माझं अजून मन भरलं नाही. त्यामुळे माझ्या राजकीय सक्रियतेच्या चर्चांना पूर्णविराम मिळावा.”, असे स्पष्ट करत अभिनेते आशुतोष राणा यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आशुतोष राणा यांंचं स्पष्टीकरण :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.