अभिनेता गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश, अजित दादांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अभिनेता गोविंदा याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता गोविंदा पुन्हा निवडणूक लढवणार का याबाबत चर्चा सुरु झाली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाने पक्ष प्रवेश केला. गोविंदा निवडून आणण्याचं काम करेल असंही सीएम एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

अभिनेता गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश, अजित दादांचं 'ते' वक्तव्य चर्चेत
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 10:38 PM

Govinda Join Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोविंदाची एंट्री झाली आहे. गोविंदानं शिंदे गटात प्रवेश केला. आता गोविंदाला लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर गोविंदाच्या शिंदे गटातल्या प्रवेशामुळं 15 दिवसांआधीच्या अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा सुरु झालीे आहे. अभिनेता गोविंदा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गोविंदानं शिंदे गटाचा भगवा हाती घेतला. त्यासोबतच गोविंदा मुंबईतून लढणार याचीही चर्चा सुरु झालीये.

गोविंदाच्या शिंदे गटातल्या प्रवेशावरुन जयंत पाटलांनी टोला लगावला आहे. गोविंदाचे पिक्चर आता चालत नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. ज्यांचे पिक्चर चालतात त्यांना घ्या असा टोला त्यांनी लगावला आहे.

जयंत पाटलांनी कलाकारांचा अपमान करु नये, असं मुख्यमंत्री शिंदे जयंत पाटलांना म्हणाले आहेत. विशेष म्हणजे महायुतीत अजित पवारांचा सामना शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याशी सुरु आहे. शिरुरमध्ये दादांच्या गटाचे शिवाजीराव आढळरावांची लढत अभिनेते आणि शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हेंशी आहे.

ज्यावेळी उमेदवार नसतो तेव्हा राजकीय पक्ष अभिनेत्यांना बाहेर काढतात, असं अजित पवार 15 दिवसांआधीच बोलले होते. ज्यात आता शिंदे गटात प्रवेश केलेल्या गोविंदाचाही उल्लेख अजित पवारांनी केला होता.

गोविंदा 2004 मध्ये काँग्रेसकडून लढलेत. उत्तर मुंबईतून त्यावेळी गोविंदाने भाजपचे दिग्गज राम नाईकांना पराभूत केलं होतं. गोविंदाला 5 लाख 59 हजार763 मतं मिळाली होती. तर राम नाईकांना 5लाख 11 हजार 492 मतं मिळाली. 48,271 मतांनी गोविंदाचा विजय झाला. मात्र 2009 मध्ये गोविंदानं राजकारणातून माघार घेतली. आता गोविंदाला शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास गोविंदाचा सामना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकरांशी असेल. तर शिंदेंच्या कामामुळं प्रभावित झाल्यानं शिवसेनेत आल्याचं गोविंदाचं म्हणणंय.

2004 मध्ये काँग्रेसकडून गोविंदा एकदा खासदार झालाय. आता गोविंदाचा पुढचा राजकीय पिक्चर शिंदेंच्या शिवसेनेसोबत सुरु झालाय. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांना उमेदवारी मिळते का की ते इतर उमेदवारांचा प्रचार करताना दिसतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.