राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवेश का केला? सयाजी शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले….

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच का प्रवेश करत आहोत? याबाबतची भूमिका मांडली. आपल्याला याआधी अनेकांकडून राजकारणात येण्याची ऑफर आली होती. पण आपण आठ दिवसांपूर्वी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, असं सयाजी शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रवेश का केला? सयाजी शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले....
सयाजी शिंदे
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 7:28 PM

दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सयाजी शिंदे यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळीच आपण राजकारणात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का निवडला? याचं कारण सांगितलं आहे. “अजून मी पुढारी झालो नाही. प्रोटोकॉलप्रमाणे बोलता येत नाही. सिनेमात नेत्याचा आणि मंत्र्यांच्या भूमिका केल्या आहेत. खलनायक साकारला. वाईट माणसाने राजकारणात यावं की नाही असं नाही. राजकारणात येईल की नाही वाटलं नव्हतं. मी सामाजिक कार्याची सुरुवात केली. आईच्या वजनाएवढ्या बिया लावण्याचं काम करणार असं ठरवलं होतं. हे काम करत असताना मी २५ वेळा मंत्रालयात गेलो असेल तर त्यातील १५ वेळा दादांना भेटलो. जेव्हा जेव्हा भेटलो दादा एक घाव दोन तुकड्यासारखं काम करायचे. पटकन निर्णय घ्यायचे. जेव्हा जेव्हा काही झालं तर मी दादांना भेटलो”, अशी आठवण सयाजी शिंदे यांनी सांगितली.

“अजित दादा नेहमी वेळेचं भान ठेवतात. पटकन निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर वाटला. मला आठ दिवसापूर्वी वाटलं राजकारणात जावं. सिस्टिमच्या बाहेर राहण्यापेक्षा आत गेल्यास पटकन निर्णय घेता येईल. यापूर्वीही मला अनेकांनी राजकारणात येण्याबाबत विचारलं होतं. पण मी नाही म्हणून सांगितलं. पण गेल्या आठवड्यात मनात विचार आला आणि आज राष्ट्रवादीत आलो आहे. अनेकांना शॉक बसला असेल”, असं सयाजी शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच का प्रवेश केला?

“मला राष्ट्रवादीचे विचार आणि स्ट्रॅटेजी आवडल्या. त्यामुळे मी या पक्षात आलो. शेतकऱ्यांची कला ही सर्वोत्तम कला आहे. लाडकी बहीणचा जो निर्णय आहे, तो सर्वोत्तम निर्णय आहे. गावातील हातातोंडावर पोट असलेल्यांचं समाधान पाहिलं तर वाटलं यांचे निर्णय चांगले आहेत. एका पॉइंटलवा वाटलं आता काही हटत नाही, जे व्हायचं ते होऊ द्या”, असं सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केलं.

“मी त्यांच्याकडून राजकारण शिकेन. राजकारणाचे धडे घेईन. माझ्या डोक्यात जी कामे आहेत, ती पुढच्या पाच वर्षात करणार आहे. मला काही स्वार्थ नाही. माझ्या आयुष्यात सर्वकाही झालं आहे. ५०० ते ६०० सिनेमे केले. जगात नाव आहे. मला काही नको. पण मला पर्यावरणावर काम करायचं आहे. मला झाडं लावणारे, तज्ज्ञांचा चेहरा व्हायचं आहे. मी सर्व गोष्टी बोलत नाही. मी चांगल्या मार्गावर आहे. सर्व पक्ष चांगले असतात. पण इथे मला जो विश्वास वाटला, त्याचा सार्थ अभिमान आहे”, असं सयाजी शिंदे म्हणाले.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.