Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे गट मेहेरबान! आदित्य सोडून इतर 14 आमदारांना निलंबनाची नोटीस

Shiv sene MLA Disqualification News : शिवसेनेच्या उर्वरीत आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जातेय

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे गट मेहेरबान! आदित्य सोडून इतर 14 आमदारांना निलंबनाची नोटीस
आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 6:40 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाने (Maharashtra Politics) गेल्या पंधरा दिवसात अनेक ट्वीस्ट आणि टर्न पाहिले. हे राजकारणातील हे धक्कातंत्र अजूनही संपलेलं नाही. सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी पार पडली. या चाचणीवेळी आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटाचा व्हीप झुगारला. त्यांनी एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या विरोधात मतदान केलं. पण त्यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray News) समर्थनात असलेल्या 15 पैकी 14 आमदारांना निलबंनाची नोटीस पाठवली आहे. व्हीप पाळला नाही, याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे यांनी 164 मतं मिळवली होती. तर त्यांच्या विरोधात 99 मतं पडली होती. आता आदित्य ठाकरेंना निलंबनाची नोटीसा का पाठवण्यात आली, यावरुनही चर्चांना उधाण आलंय. भरत गोगावले यांनी याबाबत प्रतिक्रियाही दिली आहे.

आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलतना एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटलंय, की

हे सुद्धा वाचा

आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो. याच कारणामुळे आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवलेली नाही.

दरम्यान, आता शिवसेनेच्या उर्वरीत आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जातेय. सोमवारी शिवसेनेच्या वतीने सुनील प्रभू यांनीही व्हीप जारी केला होता. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मतदान करावं, असं व्हीपमध्ये सांगण्यात आलेलं. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही व्हीप जारी करत एकनाथ शिंदे यांना मतदान करावं अशा सूचना दिल्या होत्या.

कुणाचा व्हीप खरा?

कुणाचा व्हीप खरा आणि कुणाचा खोटा यावरुन कायदेशीर लढा, शिवसेना लढणार आहे, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली आहे. तर रविवारी विधीमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे यांनाच गटनेता ठरवत अजय चौधरी यांच्या गटनेते पदाची मान्यता रद्द केली होती. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.