Aditya Thackeray Ayodhya tour : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी संजय राऊत, एकनाथ शिंदे अयोध्येत; राम जन्मभूमीचं दर्शन आणि नियोजनाचा आढावा

शिवसेना खासदार संजय राऊत, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सुरज चव्हाण हे आज अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊत आणि शिंदे यांचा हा पाहणी दौरा मानला जात आहे.

Aditya Thackeray Ayodhya tour : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी संजय राऊत, एकनाथ शिंदे अयोध्येत; राम जन्मभूमीचं दर्शन आणि नियोजनाचा आढावा
संजय राऊत, एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 10:28 PM

अयोध्या : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात शिवसेनेनं हिंदुत्वाला मुठमाती दिल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपकडून केला जातोय. तर शिवसेना नेत्यांकडूनही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अयोध्या दौरा जाहीर केलाय. 15 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सुरज चव्हाण हे आज अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊत आणि शिंदे यांचा हा पाहणी दौरा मानला जात आहे.

अयोध्येत दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हा काही शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम नाही. कोरोनामुळे मागील दोन वर्षात आम्ही अयोध्येला येऊ शकलो नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येणार होते. आता आदित्य ठाकरे येत आहेत. हा राजकीय नाही तर धार्मिक दौरा आहे. कार्यक्रम जंगी होणार, शरयू नदीवर महाआरती होणार, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. यावेळी पत्रकारांनी राऊतांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला झालेल्या विरोधावर विचारलं असता राऊतांनी बोलणं टाळलं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख 10 जून जाहीर करण्यात आली होती. मात्र, राज्यसभा निवडणुकीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. बीकेसीतील मैदानावर झालेल्या सभेत संजय राऊत यांनी आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची 15 जून तारीख जाहीर केली होती. त्यानुसार आता 15 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

संजय राऊत पत्रकार परिषद घेणार

दरम्यान, संजय राऊत, एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई हे आज अयोध्येतील पंचशील हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत. उद्या सकाळी साडे नऊ वाजता ते प्रभू श्रीराम जन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. तर साडे अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळतेय. त्यावेळी संजय राऊत काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल.

हे सुद्धा वाचा

अयोध्येत असली नकलीचे बॅनर

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी अयोध्येत शिवसेनेनं असली आणि नकलीचे बॅनर लावले होते. या बॅनरवर श्रीरामाचा फोटो, त्यासमोर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता. तसंच जय श्रीराम असं मोठ्या अक्षरात लिहिण्यात आलेलं होतं. तर बॅनरवर वरच्या बाजूला असली आ रहा है नकली से सावधान, असं लिहिण्यात आलं होतं. हा एकप्रकारे राज ठाकरे यांना शिवसेनेनं टोला लगावला होता. त्यावेळी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला नव्हता.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगित

राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध केला. तसंच राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला. मात्र, बृजभूषण सिंह यांना दिल्ली आणि महाराष्ट्रातून रसद पुरवली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.