शर्ट झटकलं, मान हलवली, दाढीला हात, आदित्य ठाकरे यांच्याकडून भर सभेत एकनाथ शिंदे यांची नक्कल, पाहा VIDEO

ठाण्यात महाविकास आघाडीकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या मोर्चादरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाषण केलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नक्कल केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी वन्स मोर अशी घोषणाबाजी केली.

शर्ट झटकलं, मान हलवली, दाढीला हात, आदित्य ठाकरे यांच्याकडून भर सभेत एकनाथ शिंदे यांची नक्कल, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 7:06 PM

ठाणे : ठाण्यात महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) आज जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांच्यावर करण्यात आलेल्या हल्लावरुन शिवसेना (Shiv Sena) आणि पोलिसांच्या विरोधात महाविकास आघाडीने आज जनप्रक्षोभ मोर्चा काढला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. या मोर्चाची ठाणे पोलीस आयुक्ताल जवळ सांगता झाली. यावेळी तिथे आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली. आदित्य यांनी आपल्या भाषणावेळी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. यावेळी कार्यकर्त्यांनी वन्स मोर अशी घोषणाबाजी केली.

“महिलांवर हात उचलायचे, सुषमा ताई, सुप्रिया ताईंना शिवीगाळ करायची आणि मर्दानगी दाखवायची”, अशी टीका करत असताना आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. यावेळी त्यांनी शर्ट झटकलं, इकडेतिकडे बघितलं आणि नंतर दाढीला हात लावला. त्यांच्या या नक्कलीवर अनेक कार्यकर्ते हसले. त्यानंतर त्यांनी पुन्हा निशाणा साधायला सुरुवात केली. “असे लोकं एकदाच होतात. परत कधी येऊ द्यायची नाही. लोकशाही आहे की लोकशाही संपली? मोर्चा काढलं तर बोलायचं नाही तर आरती करायची का?”, असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

भाषणावेळी पुन्हा मुख्यमंत्र्यांची नक्कल

“हॉस्पिटलमध्ये आमची रोशनी ताई ऑक्सिजनची नळी लावून आहे. बेडवर आहे. तिला बोलता येत नाही. काल तिचे हाल पाहिले. तिची मनस्थिती काय आहे, तिला किती त्रास होतोय ते पाहिलं. पण बाहेर पोलीस बसवले आहेत. कारण ती ज्या मिनिटाला बरी होईल आणि बसेल त्या मिनिटाला तिला अटकेत टाका आणि बाहेर पाठवून द्या. मान्य आहे? नाही. पण आजच्या अटी-शर्तींनुसार मला या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करायला लागतंय”, असं म्हणत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची नक्कल केली. यावेळी पुन्हा त्यांनी शर्ट झटकलं आणि दाढीला हात लावला. “माझी पण दाढी आहे. नाहीतर नंतर सलूनचं दुकान काढावं लागेल”, असं ते उपरोधिकपणे म्हणाले.

“तुमच्या स्वत:च्या मतदारसंघात एका महिलेवर अत्याचार होतो. तिला पोटात लाथा मारल्या जातात. महिला सुरक्षित नाही. पुढे जाऊन तिच्यावर गुन्हा दाखल होतो. सगळ्यांनी सीसीटीव्ही पाहिले. हल्ला महिलेवर झालाय. बाई-पुरुष दोन्ही तिला मारत आहेत. इथल्या माजी महापौर आहेत, त्या शिंदे गटात गेल्या आहेत, त्यांनी सांगितलंय की, असाच धडा शिकवला पाहिजे. असं कसं राज्य चालू शकतं? तुम्ही मंत्री म्हणून बसता तेव्हा तुमचा आमचा कुणी नसतो. सगळे आपली असतात. पाणी देताना धर्म, जात, रंग बघितलं जात नाही. मतदान कोणी कुणाला केलंय हे बघितलं जात नाही. सर्वांची सेवा करायची असते. हेच शिवसेनेने शिकवलं आहे. हेच महाविकास आघाडीचं ध्येय होतं. पण या माणसाचं किती कौतुक करायचं?”, असा घणाघात त्यांनी केला.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.