Shivsena | भिवंडीपासून औरंगाबादपर्यंत आदित्य ठाकरेंचा झंझावाती दौरा; उद्यापासून शिवसंवाद यात्रा सुरू

शिव संवाद यात्रेचा प्रारंभ हा दि. 21 जुलै 2022 रोजी भिवंडी येथे दुपारी 12 वाजता संपन्न होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याने होणार असून प्रथम दिवसाच्या यात्रेची सांगता नाशिक येथे सायं ६.३० या वेळेत होणाऱ्या जन मेळाव्याने होणार आहे.

Shivsena | भिवंडीपासून औरंगाबादपर्यंत आदित्य ठाकरेंचा झंझावाती दौरा; उद्यापासून शिवसंवाद यात्रा सुरू
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 2:15 PM

महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेशी आणि लाखो मनांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्य उद्धव ठाकरे, दि. 21 ते 23 जुलै 2022 या काळात महाराष्ट्रातील शिव संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. या यात्रेच्या प्रथम टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डीमधील (Shirdi) समाजातील सर्व वयोगट आणि समाज बांधवांशी ते संवाद साधणार आहेत. सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि प्रामुख्याने तरुणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा हा दौरा असेल. सत्तेच्या साठमारीत न पडता समाजकारण करत लोकांच्या समस्यांवर उपाय शोधून त्यांना चिंतामुक्त करणे हेच संकल्पित शिवसंवादाचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या या संवाद यात्रेला विशेष महत्त्व तर आहेच, पण त्याहूनही अधिक म्हणजे ही संवादयात्रा समाजातील सर्व स्तरातील जनतेपासून ते शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा आणणारी ठरणार आहे.

शिव संवाद यात्रा वेळापत्रक

शिव संवाद यात्रेचा प्रारंभ हा दि. 21 जुलै 2022 रोजी भिवंडी येथे दुपारी 12 वाजता संपन्न होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याने होणार असून प्रथम दिवसाच्या यात्रेची सांगता नाशिक येथे सायं ६.३० या वेळेत होणाऱ्या जन मेळाव्याने होणार आहे.

हे सुद्धा वाचा

– दुपारी 12 वाजता भिवंडी येथे मेळाव्याने शिव संवाद यात्रेला सुरुवात – दुपारी 02:30 ते 02:50 शहापूर येथे स्वागत संवाद – दुपारी 03:50 ते 04:15 इगतपुर येथे स्वागतसंवाद – संध्याकाळी 05:45 ते 06:45 वाजता नाशिक येथे शिव संवाद मेळावा

दि. 22 जुलै 2022 या शिव संवाद यात्रेच्या द्वितीय दिवशी सकाळी 11.45 या वेळेत मनमाड शहरात संपन्न होणाऱ्या मेळाव्यात श्री. आदित्य ठाकरे जनतेला संबोधित करणार असून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेची सांगता संभाजीनगर येथे सायं 6.30 वाजता होणाऱ्या मेळाव्याने होईल.

– सकाळी 11:45 ते दुपारी 12:45 मनमाड येथे शिव संवाद मेळावा – दुपारी 01:40 ते 2 वाजेपर्यँत येवला येथे स्वागत संवाद – दुपारी 02:45 ते 3 वाजेपर्यँत वैजापूर येथे स्वागत संवाद – संध्याकाळी 05:30 ते 06:30 वाजता संभाजीनगर येथे शिव संवाद मेळावा

दि. 23 जुलै 2022 या शिव संवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वा पैठण येथे शिवसैनिकांकडून श्री. आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. यात्रेची सांगता सायं 5.15 शिर्डी येथे शिर्डी वासीयांकडून आदित्यसाहेबांच्या स्वागताने तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री. साईंच्या दर्शन आणि आशीर्वादाने होईल.

– सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यँत पैठण येथे स्वागत संवाद – दुपारी 2 ते 02:20 गंगापूर येथे स्वागत संवाद – दुपारी 02:50 ते 4 वाजेपर्यँत नेवासा येथे शिव संवाद मेळावा – संध्याकाळी 04:45 ते 05:15 शिर्डी येथे स्वागत आणि दर्शन

हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.