उदयनराजेंना हरवण्यासाठी हातात खडू घ्या, भिंतीवर धनुष्यबाण काढा : चंद्रकांत पाटील
सातारा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून यावे यासाठी ते जोरदार प्रयत्न करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी सांगली आणि साताऱ्यावरही लक्ष्य केंद्रीत केले आहे. साताऱ्यात आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना हरवण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना खास […]
सातारा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून यावे यासाठी ते जोरदार प्रयत्न करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी सांगली आणि साताऱ्यावरही लक्ष्य केंद्रीत केले आहे. साताऱ्यात आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना हरवण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना खास कानमंत्र दिला आहे. साताऱ्यातून युतीकडून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील मैदानात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीने सहदेव एवळे यांना उमेदवारी दिली आहे.
साताऱ्यात प्रचार करण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरत चंद्रकांत पाटील म्हणाले, रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि आपल्या घरातील भिंतीवर धनुष्यबाणाचे चिन्ह काढा. त्याच्याखाली उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच, असे लिहा. मग बघा कशी एनर्जी येते.” युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले पाटील साताऱ्यातील वाई येथील सभेवेळी बोलत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार पोरीसाठी 4-4 सभा घेत असल्याचे म्हणत पवारांनाही टोला लगावला.
सातारा लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. त्यानुसार 23 एप्रिलला साताऱ्यासह महाराष्ट्रात एकूण 14 मतदारसंघांसाठी मतदान होईल. या मतदारसंघांमध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले यांचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ: