देवेंद्र फडणवीस यांना कुठे अडकवण्याचा प्लॅन होता? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट, वाचा सविस्तर
दिलीप वळसे पाटील, अजित दादा, नांगरे पाटील यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
ब्रिजभान जैस्वार, मुंबईः महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मला अडकवण्याचा प्लॅन होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. या दाव्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दुजोरा दिला आहे. टीव्ही 9 शी बोलताना सदावर्ते यांना मोठा दावा केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असल्याने मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता… पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर माझ्याकडून आणखी काही वदवून घेण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.
नागपूर RSS आणि फडणवीस…
आंदोलकांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता, त्यावेळी मला चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. डीसीपी निलोत्पल यांनी मला रात्री बोलावून माझ्याशी पवारांच्या हल्ल्यासंदर्भात चर्चा कमी तर नागपूर RSS आणि फडणवीस यांच्या भेटीगाठीसंदर्भात प्रश्न विचारले होते, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.
काहीही करून त्यांना माझ्या तोंडवून वेगळंच काही वदवून घ्यायचं होतं, हा कट रचला गेला होता, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील, संजय रांडे यांच्या तोंडून त्या वेळी कट असा शब्द निघाला होता… दिलीप वळसे पाटील, अजित दादा, नांगरे पाटील यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
या पुढाऱ्यांची बैठक झाली होती, त्याला संजय पांडे उपस्थित होते.. या कटात आरएसएस व फडणवीस यांनाच अडकवायचं होतं, असा दावा सदावर्ते यांनी केलाय.
‘पवारांच्या काळात दाऊद मोठा झाला’
शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला. हा कटच होता. दिलीप वळसे पाटील, अजित दादा हे पवारांचे प्यादे आहेत… संजय पांडेंना पोलीस आयुक्त म्हणून बसवण्यामागचं कारण हेच होतं.. नुसता कट नाही तर हे जेलमध्ये जातील… असा प्रयत्न होता. माझ्यावर दबाव होता. मी नावं घ्यावीत अशा अनुशंगाने मोहोळ उभं केलं जायचं, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.
शरद पवार हे अतिशय घाणेरडे राजकारणी आहेत. या कटामागे त्यांचाच हात होता, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय.