Nirmala Sitharaman : देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर निरीक्षक निर्मला सीतारमण म्हणाल्या…..

Nirmala Sitharaman : "लोकांनी त्यांच्या अनुभवानुसार काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकार त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या कामात व्यत्यत आला होता. त्यामुळे लोक वैतागले होते. त्यामुळे राज्यात काय चाललंय असं लोकांच्या मनात होतं"

Nirmala Sitharaman : देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर निरीक्षक निर्मला सीतारमण म्हणाल्या.....
Nirmala Sitharaman
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 12:24 PM

“नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा. या निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 कोटी जनता जर्नादनचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे. ही नियमित विधानसभा निवडणूक नव्हती. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक त्याआधी हरियाणाची निवडणूक यातून जनतेचा संदेश स्पष्ट आहे. हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश आहे” असं निर्मला सीतारमण म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेता निवडीसाठी निरीक्षक म्हणून मुंबईत आल्या आहेत. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी भाषण केलं.

“लोकांनी त्यांच्या अनुभवानुसार काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकार त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या कामात व्यत्यत आला होता. त्यामुळे लोक वैतागले होते. त्यामुळे राज्यात काय चाललंय असं लोकांच्या मनात होतं. त्यामुळेच त्यांनी हा कौल दिला आहे. त्यामुळे हा कौल तुम्ही योग्य पद्धतीने पुढे न्याल. डबल इंजिनचं सरकार मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या भविष्यासाठी पुढे न्याल” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

स्टार्टअपसाठी मोठं योगदान

“निवडणुकीतील घोषणा तुम्ही पूर्ण कराल. राज्यातील काँग्रेसच्या काळातील सरकारमध्ये जनतेचं कसं नुकसान झालं हे लोकांना दाखवून आपल्याला पुढे जायचं आहे. शेतकरी, उद्योग आणि कोणत्याही क्षेत्रातील कामे असतील ती पुढे न्यायची आहेत. एआयमध्ये आपले तरुण स्टार्टअपसाठी मोठं योगदान देत आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणखी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे स्टार्टअपमध्ये आपण मोठं योगदान देऊ शकतो” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.