Ashok Chavan | ‘फडणवीस जे सांगतील ते काम…’ अशोक चव्हाणांच भाजपा प्रवेशाच्यावेळी मोठ वक्तव्य
Ashok Chavan | भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण यांनी काही महत्त्वाची विधान केलीत. "मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी आलो. योग्यवेळी योग्य गोष्टी बोलणार आहे" असं अशोक चव्हाण म्हणाले.
Ashok Chavan | काँग्रेसची अनेक वर्षांची साथ सोडून अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला. पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण यांनी काही महत्त्वाची विधान केलीत. “सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा, फडणवीस, बावनकुळे, शेलार यांचे आभार मानतो. आम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलिकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले. “आयुष्याची खरी सुरुवात करत आहे. 30 वर्षाच्या राजकीय प्रवासात बदल करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे. वाटचाल करणार आहे. देशाच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे, यासाठी मी आलो आहे. मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना विकासाचा दृष्टीकोण ठेवून मी काम करत आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले.
भाजपामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने काम करणार त्या बद्दलही अशोक चव्हाण यांनी महत्त्वाच भाष्य केलं. “नवीन सुरुवात करत आहे. भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. पक्ष जो आदेश देईल, फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे. मी काही मागणी केली नाही. मला जे काही सांगितलं जाईल ते करेल. मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे मी आलो. मी आज जास्त बोलणार नाही. मी पक्षात नवीन आहे. योग्यवेळी योग्य गोष्टी बोलणार आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले.
‘पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलत आहेत, पण….’
“विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेल. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलत आहेत. काही समर्थन करत आहेत. पण मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही. मला बावनकुळे यांनी पक्षप्रवेश दिला. मी फिस दिली, उधार ठेवली नाही” असं अशोक चव्हाण म्हणाले.