Balasaheb Thorat : मातोश्रीवरुन बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं महत्त्वाच वक्तव्य

Balasaheb Thorat : "राजकराणात भाषण करण्याचा, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. पूर्वी उच्च पातळीला हे सर्व चालायत. पण दुर्देवाने मागच्या पाच वर्षात पातळी घसरली आहे. त्याच स्वरुप पहायला मिळतय" असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat : मातोश्रीवरुन बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचं महत्त्वाच वक्तव्य
balasaheb thorat
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 2:27 PM

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मविआमध्ये अजूनही काही जागांवर जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात बाहेर येऊन मीडियाशी बोलले. “उद्धव ठाकरेंसोबत मी चर्चा केलेली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्नीथला यांनी माझ्यावर उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना भटेण्याची जबाबदारी सोपवली होती. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो का? हा विचार चर्चेमध्ये होता. त्या दृष्टीने काही चर्चा झाली. काही विषय असे असतात, ज्यात प्रत्यक्ष जाऊन भेटून बोलणं आवश्यक असतं. बैठकीत जे झालं ते मी चेन्नीथला आणि खरगे साहेबांना सांगणार” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“काही कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत. राहुलजी, उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊन काही कार्यक्रम करायचे आहेत. त्या विषयी चर्चा झाली” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करायला दोन दिवस बाकी आहेत, किती जागांवर चर्चा बाकी आहे? यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, “अशा गोष्टी निवडणुकीत शेवट्च्या क्षणापर्यत चालत असतात. आम्ही मैत्रीपूर्ण लढती अजिबात करणार नाही. महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त जागा जिंकून आणणार. आम्ही 180 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच लक्ष्य ठेवलं आहे. आम्हाला सरकार आणायच आहे. मुख्यमंत्री बसवायचा आहे”

मुलीसंदर्भात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

जयश्री थोरात यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी विचारलं. “राजकराणात भाषण करण्याचा, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. पूर्वी उच्च पातळीला हे सर्व चालायत. पण दुर्देवाने मागच्या पाच वर्षात पातळी घसरली आहे. त्याच स्वरुप पहायला मिळतय” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. “सुजय विखे पाटील संगमनेर तालवुक्यात येतात, त्याचा तो अधिकार आहे. भाषण कोणात्या थराच करतात. जयश्री संदर्भातील वक्तव्याचा निषेध सुरु आहे. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. जयश्री थोरात संगमनेरमध्ये परिस्थिती संभाळायला समर्थ आहे” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Non Stop LIVE Update
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?.
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?.
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.