Vasundhara Raje | वेळ बदलली, वसुंधरा-शिवराज यांचं पुढे काय होणार? BJP कुठे सेट करणार?
Vasundhara Raje | तीन राज्यांमध्ये भाजपाने नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली. यानंतर आता वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चौहान यांचं पुढे काय होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पक्षाने या दोन्ही दिग्गज नेत्यांसाठी पुढचा प्लान काय आहे, ते अजून स्पष्ट केलेलं नाही.
नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने पुन्हा सत्ता काबीज केली आहे. भाजपाने या तिन्ही राज्यात जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलय. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी विष्णुदेव साय, एमपीमध्ये मोहन यादव आणि राजस्थानात भजन लाल शर्मा यांना निवडण्यात आलय. छत्तीसगडमध्ये तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या रमन सिंह यांना विधानसभा स्पीकरपदी सेट केलय. पण 18 वर्ष मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानात दोनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या वसुंधरा राजे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे.
अटल-आडवणी यांच्या काळात भाजपाने वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान आणि डॉ. रमन सिंह यांना मुख्यमंत्रीपदासाठी निवडलं होतं. तिन्ही नेत्यांनी आपआपल्या प्रदेशात छाप उमटवली. स्वत:च नेतृत्व सिद्ध केलं. पण आता मोदी-शाह यांच्या काळात वेळ बदललीय. या तिन्ही नेत्यांना मुख्यमंत्री बनण्याऐवजी मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्याच नाव प्रस्तावित कराव लागलय. वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान यांच पुढे काय होणार? त्यांच राजकीय भविष्य काय असेल? या विषयी विविध अंदाज वर्तवले जातायत.
शिवराज सिंह, वसुंधरा राजे यांचं वय किती?
शिवराज सिंह चौहान आता 64 वर्षांचे आहेत. वसुंधरा राजे यांचं वय 70 वर्ष आहे. दोन्ही नेते लोकप्रिय आहेत. राजकीय समर्थन त्यांच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीला चार महिने बाकी आहेत. त्यामुळे भाजपा या दोन्ही दिग्गज नेत्यांकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यांना पक्ष संघटनेत किंवा केंद्र सरकारमध्ये नवीन भूमिका मिळू शकते.
आधी विचारलेल
वसुंधरा आणि शिवराज दोघांनाही याआधी केंद्राच्या राजकारणात येण्याचा पर्याय देण्यात आला होता. पण त्यावेळी त्यांनी मान्य केलं नाही. दोघे राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिले. 2018 मधील पराभवानंतर वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चौहान यांना राष्ट्रीय टीममध्ये जागा मिळाली होती. वसुंधरा राजे झालरापाटन येथून आमदार आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
वसुंधरा राजे यांच्यासाठी काय प्लान?
वसुंधरा राजे यांचे सुपूत्र दुष्यंत खासदार आहेत. वसुंधरा राजे यांना 2024 मध्ये केंद्राच्या सत्तेत सामावून घेण्यासाठी मुलाच्या जागी त्या निवडणूक लढवू शकतात. अशावेळी मुलगा झालरापाटन येथून आमदारकीची निवडणूक लढवेल. वसुंधरा राजे यांना कदाचित राज्यपालही बनवलं जाऊ शकतं.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राजकीय भविष्याबद्दलही बरेच तर्क-वितर्क सुरु आहेत. केंद्रीय मंत्रीपदपासून भाजपा पक्ष संघटनेत त्यांचा समावेश केला जाऊ शकतो. स्वत:साठी काही मागण्यापेक्षा मरण पत्करेन असं शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपाच केंद्रीय नेतृत्व या दोघांना कसं सामावून घेतं, ते येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईलच.