anil deshmukh resign: अनिल देशमुख हे दिल्लीत सुप्रीम कोर्टात गेले की प्रफुल्ल पटेलांच्या घरी गेलेत?
राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे नागपूरला जाण्याऐवजी दिल्लीला रवाना झाले आहेत. (after resignation anil deshmukh leave for delhi)
मुंबई: राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे नागपूरला जाण्याऐवजी दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते कुणाला भेटणार हे अद्याप कळू शकले नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (after resignation anil deshmukh leave for delhi)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद न साधता थेट विमानतळ गाठले होते. त्यामुळे देशमुख नागपूरला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, सायंकाळी 5 वाजताच्या फ्लाईटने देशमुख थेट दिल्लीला गेले. दिल्लीत ते राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार आहेत. पटेल यांच्या घरी जाऊन ते या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा करणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्याव्यतिरिक्त दिल्लीत ते कोणत्या राजकीय नेत्यांना भेटणार याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांच्या या दिल्लीवारीवर तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार?
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप सिंग यांनी केला होता. त्याबाबत अॅड. जयश्री पाटील यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणी कोर्टाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देण्यासाठीच देशमुख दिल्लीत आले असल्याचं समजतं. ते उद्या सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं सांगण्यात येतं. त्या संदर्भात आज ते काही वकिलांच्या भेटी घेणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
अब्रुनुकसानीचा दावा करणार?
दरम्यान, सिंग यांनी आरोपानंतर देशमुख यांनी सिंग यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला होता. परंतु, त्यांनी आजवर हा दावा दाखल केला नाही. उलट या प्रकरणात त्यांचं मंत्रिपदही गेलं. त्यामुळे ते सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करण्याबाबतही वकिलांशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. देशमुखांकडून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंकडे शंभर कोटी वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर अॅड. जयश्री पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने या प्रकरणाची सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली. (after resignation anil deshmukh leave for delhi)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 5 April 2021 https://t.co/sRrOXb7hgs #Superfast100News | #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021
संबंधित बातम्या:
Anil Deshmukh resign: अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना
आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!
हसन मुश्रीफ तातडीने मुंबईकडे रवाना, गृहमंत्रीपदाचा चार्ज जवळपास निश्चित!
(after resignation anil deshmukh leave for delhi)