Congress : धक्कादायक, सूरत, इंदोरनंतर आता आणखी एका ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक लढण्यास नकार
Congress : काँग्रेससाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. आणखी एका काँग्रेस उमेदवाराने निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या भूमिकेमुळे भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. हा देशातील लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पहिला विजय ठरला. इंदोरमध्ये उमेदवाराने माघार घेतली. आता तसाच इशारा आणखी एका उमेदवाराने दिला आहे.
सूरत, इंदोरनंतर काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. आोदिशाच्या पुरीमधील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नाहीय, असं सुचारिता मोहंती यांनी सांगितलं. पार्टी फंडिंगशिवाय निवडणूक प्रचार मला शक्य नाहीय. म्हणून मी निवडणूक लढवण्यास नकार दिलाय असं सुचारिता मोहंती म्हणाल्या. पुरी येथून भाजपाकडून संबित पात्रा निवडणूक रिंगणात आहेत. संबित पात्रा भाजपा प्रवक्ते असून टीव्ही वर विविध डिबेट शो मध्ये भाजपाची बाजू ते प्रखरपणे मांडत असतात.
काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना सुचरिताने पत्र लिहिलं आहे. पुरी लोकसभा मतदारसंघात आम्हाला प्रभावी पद्धतीने प्रचार करता येत नाहीय. कारण पार्टीने मला फंड देण्यास नकार दिला आहे. “मी याबद्दल जेव्हा, ओदिशा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी, तुम्ही तुमच्या फंडाची व्यवस्था करा असं उत्तर दिलं”
‘पण त्यानेही काही झालं नाही’
“मी पगार घेणारी प्रोफेशनल पत्रकार होती. 10 वर्षापूर्वी मी निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. पुरीमध्ये निवडणूक प्रचारात मी समर्पण भावनेने काम करतेय. प्रगतीशील राजकारणासाठी मी पब्लिक डोनेशन ड्राइव सुद्धा चालवलं. पण त्यात खास यश मिळालं नाही. मी अंदाजित निवडणूक खर्च कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण त्यानेही काही झालं नाही” असं सुचारिताने लिहिलं आहे.
‘मी आपल्या बळावर पैसा जमवू शकली नाही’
काँग्रेस उमेदवार सुचारिताने म्हटलंय की, “मी आपल्या बळावर पैसा जमवू शकली नाही. म्हणून मी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे मदत मागितली. पुरीमध्ये निवडणूक प्रचारासाठी पुरेसा निधी देण्याची विनंती केली. पण मला काही सहकार्य मिळाले नाही. फक्त पैशाची कमतरता पुरीमध्ये आपलं विजयी अभियान रोखत आहे: