Dada Bhuse : ‘मी शिवसेनेतच’, बैठकीला उपस्थित राहणार का कृषिमंत्री दादा भुसे?
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोणता आमदार कुठे याचा मागोवा घेतला जात आहे. शिवाय वर्षा या मुख्यंमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. दरम्यान, कृषिमंत्री दादा भुसे हे देखील नॉट रिचेबल झाले होते.
मुंबई : शिवसेनेतले नाराज मंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे (Politics) राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. नाराज एकनाथ शिंदे हे इतर 35 आमदारांसोबत गुजरातमधील एका हॉटेलात असल्याचा दावा केला जात आहे. नाराज 13 आमदारांवरून हा आकडा थेट 35 आमदरांवर गेल्याने कोण कुणीकडे असा सवाल उपस्थित होत आहे. यातच दरम्यानच्या काळात मंत्री असलेले (Dada Bhuse) दादा भुसे हे देखील ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे आमदारांबरोबर आता मंत्रीही नाराज का अशी शंका उपस्थित होत असतानाच मी शिवसेने सोबतच आहे. शिवाय शिवसेनेच्या बैठकीलाही उपस्थित राहणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेला मात्र, बैठकीसाठी आमदार आणि मंत्र्यांची जुळवाजुळव करण्याची नामुष्की ओढावली आहे.
कुठे आहेत कृषिमंत्री दादा भुसे?
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोणता आमदार कुठे याचा मागोवा घेतला जात आहे. शिवाय वर्षा या मुख्यंमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. दरम्यान, कृषिमंत्री दादा भुसे हे देखील नॉट रिचेबल झाले होते. मात्र, संबंधिच्या बातम्या प्रसारमाध्यमात होताच आपण सेने सोबतच आहोत. शिवाय पक्ष प्रमुख यांच्या आदेशाने मुंबईतच असल्याचे सांगिलते आहे. त्यामुळे एक-एक आमदार आणि मंत्र्याच्या भूमिकेवर शिवसेनेचे लक्ष राहणार आहे.
बैठकीलाही उपस्थित राहणार भुसे
शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांचे म्हणणे आणि पुढील रणनिती ठरवण्यासाठी मंगळारी दुपारी 1 च्या दरम्यान, मुख्यंमंत्री हे बैठक घेणार आहेत. त्या अनुशंगाने बैठकीला कोण उपस्थित- राहणार आणि कोण नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापुर्वीच मंत्री दादा भुसे यांच्या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. पण मी बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत उठत असलेल्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला आहे.