भूखंडावरुन जेनेलिया आणि रितेश देशमुख यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर Agro कंपनीचा खुलासा
भूखंडावरुन जेनेलिया आणि रितेश देशमुख होणाऱ्या आरोपांबाबत Agro कंपनीने खुलासा केला आहे.
लातुर : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia) आज दिवसभर आरोपांमुळ चर्चेत होते. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप करत भाजपने केला होता. भूखंडावरुन जेनेलिया आणि रितेश देशमुख होणाऱ्या आरोपांबाबत Agro कंपनीने खुलासा केला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में.देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरु करायचा आहे.
जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. लातुरच्या नवीन midc मध्ये उद्योगासाठी जागा किंवा जमीन मिळावी यासाठी जवळपास 19 जणांचे अर्ज वर्ष- 2019 पासून प्रलंबित आहेत.
मात्र, या प्रलंबित अर्जांना टाळून रितेश आणि जेनेलिया पार्टनर असलेल्या कंपनीला भूखंड कसा दिला गेला असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
या कारखान्याच्या उभारणीसाठी लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जवळपास 116 कोटी रुपये कर्जही उपलब्ध करून दिल्याचा आरोपही केला जात आहे.
भूखंडावरुन होणाऱ्या भाजपच्या आरोपांवर रितेशच्या देश अॅग्रो कंपनीने खुलासा केला आहे. भूखंडावर घेतलेले आक्षेप वस्तुस्थितीवर आधारित नाही असा दावा कंपनीने केला आहे.
कृषी उद्योगात वाढ व्हावी हा देश अॅग्रो कंपनीचा उद्देश आहे. भूखंड रितसर आणि नियमानुसार लिजवर देण्यात आला आहे. सदर उद्योगासाठी नियमानुसार कर्ज वितरीत झाले आहे. कृषी आधारित उद्योगासाठी विरोधी भूमिका घेऊ नये असे अवाहनही कंपनीने केले आहे.