नगरच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची बैठक, मात्र संग्राम जगतापांना निमंत्रण नाही
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईत बैठकांवर बैठका सुरु आहेत. आज राष्ट्रवादीची अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी चर्चा झाली. मात्र नगरची चर्चा असूनही राष्ट्रवादीने स्थानिक आमदार संग्राम जगताप यांना आमंत्रणच दिलं नाही. नगर जिल्ह्यातील सर्व प्रतिनधी चर्चेला उपस्थित असताना, संग्राम जगताप यांची गैरहजेरी लक्ष वेधून घेणारी होती. नगर महापालिकेत संग्राम जगताप यांच्या […]
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईत बैठकांवर बैठका सुरु आहेत. आज राष्ट्रवादीची अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी चर्चा झाली. मात्र नगरची चर्चा असूनही राष्ट्रवादीने स्थानिक आमदार संग्राम जगताप यांना आमंत्रणच दिलं नाही. नगर जिल्ह्यातील सर्व प्रतिनधी चर्चेला उपस्थित असताना, संग्राम जगताप यांची गैरहजेरी लक्ष वेधून घेणारी होती. नगर महापालिकेत संग्राम जगताप यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठींबा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला संग्राम जगताप यांना आमंत्रित केलं नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
नगरसाठी राष्ट्रवादीकडून तीन नावं
दरम्यान आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी तीन नावांवर चर्चा झाली. यामध्ये माजी आमदार दादाभाऊ कळमकर, नरेंद्र घुले पाटील आणि प्रतापराव ढाकणे ही नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली. एकीकडे राष्ट्रवादीने तीन नावं निश्चित केली असली, तरी काँग्रेसही या जागेसाठी इच्छुक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा 48 पैकी 40 जागांचा तिढा सुटला आहे. मात्र 8 जागांचा तिढा कायम आहे, यामध्ये नगरच्या जागेचाही समावेश आहे.
अहमदनगरसाठी काँग्रेस इच्छुक
अहमदनगरची जागा सध्या राष्ट्रवादीकडे असली तरी तिथे विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पारंपारिक मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीही या जागेसाठी आग्रही आहे.
अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी-भाजप युती
अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं. त्यामुळे भाजपचे बाबा वाकले महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.
संबंधित बातम्या
नगरसाठी राष्ट्रवादीचा आग्रह, तीन नावं निश्चित
त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!
लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित
अहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर