अन् सासऱ्यांचीही कोंडी झाली… नेमकं काय घडलं?; वाचा राजकारणातले ‘संग्राम’ जगताप!

अत्यंत तरुण वयात राजकारणात आलेले आमदार संग्राम जगताप यांचा यशाचा आलेख वाढताच राहिला आहे. जिल्हा परिषद सदस्य, दोनदा महापौर आणि आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. (sangram jagtap)

अन् सासऱ्यांचीही कोंडी झाली... नेमकं काय घडलं?; वाचा राजकारणातले 'संग्राम' जगताप!
आमदार संग्राम जगताप
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 7:39 AM

मुंबई: अत्यंत तरुण वयात राजकारणात आलेले आमदार संग्राम जगताप यांचा यशाचा आलेख वाढताच राहिला आहे. जिल्हा परिषद सदस्य, दोनदा महापौर आणि आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत अपयश आलं होतं. मात्र, या निवडणुकीत त्यांनी सुजय विखे-पाटील यांना चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. संग्राम जगताप नेमके कोण आहेत? कसं आहे त्यांचं राजकारण वाचाच. (ahmednagar mayor to mla, know about sangram jagtap)

वडीलही आमदार

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे महाराष्ट्रातील एक तरुण नेते आहेत. ते बीकॉम झालेले आहेत. त्यांचे वडील अरुण जगताप हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. अरुण जगताप हे स्थानिक स्वराज्य संस्थेतून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. घरातच राजकारण असल्याने संग्राम जगताप यांनी राजकारणात प्रवेश केला.

दोनदा महापौरपदी

संग्राम जगताप यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हापरिषदेपासून झाली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिल्यानंतर ते 2009मध्ये पहिल्यांदा अहमदनगर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे त्याच वर्षी ते महापौरही झाले. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले. आणि त्यानंतर पुन्हा ते दुसऱ्यांदा महापौर झाले. महापौरपदी असतानाच त्यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढवली आणि अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून ते दणदणीत मतांनी विजयी झाले.

पत्नी नगरसेविका, भाऊही राजकारणात

संग्राम हे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत. संग्राम यांची पत्नी शीतल या नगरसेविका आहेत. त्याही सलग दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तर संग्राम यांचे बंधू सचिन जगताप हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. सचिन यांच्या पत्नी सुवर्णा सचिन जगताप या मांडवणगण गटातून नगर जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.

कोविड नियम मोडल्याने गोत्यात

संग्राम जगताप यांचा जूनमध्ये वाढदिवस होता. यावेळी कोविड नियम मोडून त्यांनी कार्यकर्त्यांच्या गर्दीत वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे जगताप यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी,’ अशी मागणी येथील ‘आरटीआय’ कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे केली होती. भांबरकर यांनी या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे संग्राम जगताप अडचणीत आले होते.

जावयाच्या उमेदवारीने सासरा अडचणीत

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी करत आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप असा सामना आता नगरमध्ये रंगणार होता. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून आमदार आहेत. शिवाय त्यांचे वडील अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. संग्राम जगताप यांचे सासरे आणि नगरमधील किंगमेकर राजकारणी म्हणून ओळख असलेले शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे जावई की पक्ष? अशा पेचात कर्डिले पडले होते. “शिवाजी कर्डिलेंचा पक्ष वेगळा आहे. त्यांची गोची होण्याचा प्रश्नच नाही. कारण ते कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे त्यांची गोची म्हणणं योग्य नाही. नगरमध्ये राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला पाहिजे, चांगल्या विचाराचा खासदार निवडून आला पाहिजे, स्थानिक माणूस निवडून आला पाहिजे, हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यामुळे त्यांचा विषय (शिवाजी कर्डिलेंचा) इथे येतच नाही”, असं संग्राम यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मात्र, या निवडणुकीत सुजय विखे-पाटील यांचा विजय झाला होता. तर संग्राम जगताप यांचा पराभव झाला होता. (ahmednagar mayor to mla, know about sangram jagtap)

संबंधित बातम्या:

पान टपरीवाला ते आमदार; ‘आपला कामाचा माणूस’ अण्णा बनसोडेंबद्दल घ्या जाणून!

वडिलांच्या निधनानंतर पार्टी बदलली, टोकाचा निर्णय का घेतला?; वाचा निरंजन डावखरेंचं ‘राज’कारण!

शिवसेनेच्या गडाला खिंडार ते जन आशीर्वादचे सूत्रधार; कसं आहे संजय केळकर यांचं राजकारण?

(ahmednagar mayor to mla, know about sangram jagtap)

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.