Eknath Shinde: गटनेतेपदी उद्धव गटाचे अजय चौधरीच, उपसभापतीचं निर्णयावर शिक्कामोर्तब? एकनाथ शिंदे गटाला पहिला झटका

उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेकडून आलेले अजय चौधरी यांच्या गटनेते पदावरील नियुक्तीचे पत्र स्विकारले आहे. त्यामुळे गटनेतेपदी उद्धव गटाचे अजय चौधरीच राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde: गटनेतेपदी उद्धव गटाचे अजय चौधरीच, उपसभापतीचं निर्णयावर शिक्कामोर्तब? एकनाथ शिंदे गटाला पहिला झटका
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:32 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून (Shiv Sena) त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले होते. तर त्यांच्या जागी अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडीला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आव्हान देण्यात आले आहे. मात्र आता गटनेता निवडीच्या वादात एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा झटका बसताना दिसत आहे. उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेकडून आलेले अजय चौधरी यांच्या गटनेते पदावरील नियुक्तीचे पत्र स्विकारले आहे. त्यामुळे गटनेतेपदी उद्धव गटाचे अजय चौधरीच राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्याचबरोबर आपल्याला निर्णय घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आलेले पत्र देखील तपासावे लागणार असल्याचे झिरवाळ यांनी म्हटले आहे. काही गोष्टी मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. जसे की गटनेता निवडीबाबत शिंदे गटाकडून मला जे पत्र मिळाले, त्या पत्रावर माझी सहीच नसल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे हे दोन्ही पत्र तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे झिरवाळ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले झिरवाळ?

झिरवाळ पुढे बोलताना म्हणाले की, नियमानुसार पक्षप्रमुखांकडून गटनेत्याची नियुक्ती होते, आणि गटनेता प्रतोदांची नियुक्ती करतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते पत्र आपण स्विकारलं आहे. मात्र मला एकनाथ शिंदे गटाकडून मिळालेले पत्र देखील तपासून पहावे लागणार आहे. मीडियातून काही गोष्टी समोर येत आहेत. नितीन देशमुख यांनी असा दावा केला आहे की त्या पत्रावर माझी सहीच नाही. मी इंग्रजीत सही करतो, मग पत्रावर मराठीत सही कशी आली? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच या पत्रावर काही अपक्ष आमदारांच्या देखील सह्या आहेत. त्या सह्या ग्राह्य धरता येणार नाहीत. दोन्ही पत्र तपासल्यानंतरच याबाबत निर्णय देता येईल असे झिरवाळ यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

नियम काय सांगतो?

दरम्यान शिवसेनेचा गटनेता नेमका कोण? एकनाथ शिंदे की अजय चौधरी यावर देखील पुढचे अनेक समिकरणे अवलंबून असणार आहेत. त्यामुळे गटनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नरहरी झिरवाळ काय निर्णय घेणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सभापतींची नियुक्ती केली नसल्याने उपसभापती म्हणून गटनेता निवडीचे सर्व अधिकार हे झिरवाळ यांनाच आहेत. सभापतीची नियुक्ती न केल्यास घटनेचे कलम 95 आणि 180 नुसार सभापतींचे सर्व अधिकार उपसभापतींना प्राप्त होतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.