मुंबई : कुठेही वय झाले की निवृत्ती घेतली जाते. राजकरण, शेती, उद्योग सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी निवृत्त घेतली होती. आता तुमचेही वय ८२ झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. आम्हाला आशीर्वाद द्या, आमचे कुठे चुकले तर सांगा ना. आपल्या घरातसुद्धा शेतकरी सांगतो, तू आता २५ वर्षांचा झाला. आता तू शेती पाहा मी सल्ला देईल. उद्योगपतींमध्येही ती पद्धत आहे. मग तुम्ही ती पद्धत का अवलंबत नाही, असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला. माझी अजून माझ्या पांडुरंगला विनंती आहे , आम्हाला आशीर्वाद द्यावे, त्यांनी थांबावे, असे भावनिक आवाहन अजित पवार यांनी शरद पवार यांना सांगितले.
शरद पवार यांना आधी मला सांगितले की मी राजीनामा देतो, मी संस्था पाहतो. एक कमिटी करतो. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा, असे सांगितले. दोन दिवसांत काय झाले माहीत नाही. दोन दिवसांत राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला का? माझ्यात सत्ता चालवण्याची धमक नाही का? राज्यात जे प्रमुख चार-पाच लोकांची नावे घेतली जाते, त्यात माझे नाव येते की नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. शरद पवार यांच्यासंदर्भात मी सुप्रिया सुळे यांनाही सांगितले. त्या म्हणाल्या, ते हट्टी आहेत. ते ऐकत नाही.
राष्ट्रीय पक्ष राज्याचा पक्ष झाला आहे. आपली राष्ट्रीय पक्षाची मान्यता रद्द झाली. ती आपणास परत मिळवायची आहे. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा ७१ आकडा पुढे घेऊन जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळवून देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.