महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द, पडद्यामागे काय घडतंय?

| Updated on: Apr 07, 2023 | 5:45 PM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी कार्यक्रम नेमके का रद्द केले असतील? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द, पडद्यामागे काय घडतंय?
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : महाराष्ट्राच्या राजकाणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे आजचे आणि उद्याचे कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी काही कारणास्तवर आजचे आणि उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्दद केल्याची माहिती समोर आली आहे. पण त्यांनी नेमकं कोणत्या कारणांमुळे आजचे आणि उद्याचे कार्यक्रम रद्द केले याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे अजित पवार हे मांजरीमधील कार्यक्रमाला जात होते. पण कार्यक्रमाला जात असतानाच अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. याशिवाय अजित पवार यांचे दोन दिवसांचे पुण्याचे कार्यक्रमदेखील स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याशिवाय राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा वाढू नये यासाठी अजित पवार माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. ते कडक शिस्तीचे आहेत. त्यामुळे ते प्रशासनाला तोंडावर जाब विचारताना अनेकदा बघायला मिळाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री असताना अनेक अधिकाऱ्यांना धारेवरदेखील धरलंय. विशेष म्हणजे ते कॅमेऱ्यातदेखील कैद झालंय. त्यांच्या रोखठोक स्वभावाची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला देखील आली आहे.

हे सुद्धा वाचा

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर मविआची स्थापना झाली त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या. त्यावेळी राजकीय खलबतांना कंटाळून अजित पवार यांनी थेट भाजपची हातमिळवणी केलेली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे मंत्रिपदाची शपथ घेतलेली. त्यानंतर ते सरकार फार काळ टिकलं नव्हतं. पण त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार यांना रडू कोसळलं होतं. अजित पवार जितके कडक शिस्तीचे तितकेच ते संवेदनशील आणि हळवे देखील आहेत. त्यांचा हा संवेदनशील आणि हळवा स्वभाव अनेकदा बघायला मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार यांचे अचानक दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण सुरु झालंय.

दरम्यान, अजित पवार यांनी आज दुपारीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केलेली. “कोरोना परिस्थिती काय आहे, याची नेमकी परिस्थिती सांगा, असं आम्ही सरकारला सांगितल होतं. अधिवेशनात देखील मागणी केली. संख्या वाढतेय पण अजून गांभीर्य दिसत नाही. सरकारने सांगितलं पाहिजे. आदेश काढले पाहिजेत. मंत्री मास्क वापरात नाहीत. त्यामुळे जनतेला माहिती मिळत नाही. सरकारने राज्यातील कोरोनाची सध्याची वस्तूस्थिती जनतेला सांगावी. आयोध्येला त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या. पण जे राज्यात उपलब्ध आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाची स्थिती सांगावी”, अशा शब्दांत अजित पवारांनी खडसावलंय.