Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बैठकीला गैरहजेरीचं कुठलंही कारण नको, दांडीबहाद्दर मंत्र्यांना अजितदादांची तंबी

कुठलीही अडचण असेल, तरी बैठकीला उपस्थित राहायचंच आहे' असं अजित पवार यांनी दांडीबहाद्दर मंत्र्यांना खडसावलं (Ajit Pawar Ministers Meeting)

बैठकीला गैरहजेरीचं कुठलंही कारण नको, दांडीबहाद्दर मंत्र्यांना अजितदादांची तंबी
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 9:50 AM

मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीला मंत्र्यांनी दांडी मारल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पारा चांगलाच चढला. मंत्रिमंडळ बैठकीला अजिबात गैरहजर राहू नका, अशी तंबी अजितदादांनी गैरहजर मंत्र्यांना दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ मंत्र्यांनी हजेरी लावली होती. (Ajit Pawar angry at Maha Vikas Aghadi Ministers who bunked Meeting)

यायचं म्हणजे यायचंच!

‘राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला कोणत्याही मंत्र्यांनी गैरहजेरी लावू नये. कुठलीही अडचण असेल, तरी बैठकीला उपस्थित राहायचंच आहे’ असं अजित पवार यांनी दांडीबहाद्दर मंत्र्यांना खडसावलं. शिस्तबद्धता आणि वक्तशीरपणाबद्दल अजित पवार प्रसिद्ध आहेत. पक्षातील सहकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये अजितदादांचा दरारा आहे. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती लावणाऱ्या मंत्र्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.

उद्धव ठाकरेंची प्रत्यक्ष हजेरी

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक राज्य मंत्रिमंडळ बैठकींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहत होते. मात्र पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचा भडका

राज्य लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवली. ही याचिका मराठा कोट्याबाबतच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करते.

सरकारचा सल्ला न घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दाखल केलेल्या याचिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि इतर मंत्र्यांनी आपला संताप व्यक्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Ajit Pawar angry at Maha Vikas Aghadi Ministers who bunked Meeting)

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 

  • कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास १५०० कोटीची शासन हमी
  • राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय
  • खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता

शिवसेना मंत्र्यांची बैठक

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक पार पडली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेनेचे नेते उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीपूर्वी ही बैठक झाल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

सरकारला अंधारात ठेवून MPSC ची न्यायालयात याचिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भडकले

(Ajit Pawar angry at Maha Vikas Aghadi Ministers who bunked Meeting)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.