शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देणारी पहिली सभा कुठं होणार? अजितदादांनी ठिकाण सांगितलं, मविआने मूठ आवळली, 7 ठिकाणी तोफा धडाडणार

राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागण्यापूर्वीच महाविकास आघाडीने तगडी रणनीती आखली आहे. येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील विविध भागात मविआच्या संयुक्त सभांची घोषणा करण्यात आली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देणारी पहिली सभा कुठं होणार? अजितदादांनी ठिकाण सांगितलं, मविआने मूठ आवळली, 7 ठिकाणी तोफा धडाडणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 3:54 PM

पुणे : एकिकडे सुप्रीम कोर्टात (Supreme court) शिंदे विरुद्ध ठाकरे (Thackeray) गटातील लढाई अंतिम टप्प्यापर्यंत येऊन ठेपली असतानाच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मूठ अधिकच घट्ट आवळलेली दिसून येतेय. निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देण्यासाठी राज्यभरात संयुक्त सभांची घोषणा केली आहे. राज्यात विभागनिहाय ७ ठिकाणी महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होतील. या सभांची जबाबदारी प्रत्येक विभागातील महत्त्वाच्या नेत्यावर देण्यात आली आहे. हा नेता शिवसेना, काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस या तीनपैकी कोणत्याही पक्षाचा असला तरीही सर्वांनी मिळून त्या त्या विभागातील सभा यशस्वी करायची आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. राज्यातील कोणत्याही ठिकाणी महाविकास आघाडीत फूट पडता कामा नये, असा दमही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुंबईत वाय बी सेंटर येथे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी राज्यातील महत्त्वाच्या 7 सभा कुठे होतील, याची घोषणा केली. या संयुक्त सभांना अजित पवार, उद्धव ठाकरे तसेच नाना पटोले उपस्थित असतील.

मराठवाड्यातून सुरुवात

महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची सुरुवात मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथून होणार आहे. येथील सभा यशस्वी करण्याची जबाबदारी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संभाजीनगरातील सभेचं ठिकाण प्रचंड मोठं असावं, येथील सभा अतिभव्य करण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर असेल, यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.

मविआच्या सभा कधी आणि कुठे?

  1. पहिली सभा- 2 एप्रिल 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सभा होईल. मराठवाडा विभागासाठी ही सभा असेल. तर शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्यावर सभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  2. दुसरी सभा- 16 एप्रिल 2023 रोजी नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी सभा होईल. सुनिल केदारे यांच्यावर या सभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  3. तिसरी सभा-1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत तिसरी सभा होईल. या सभेची जबाबदारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इथे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आदी सर्व परिसरातील कार्यकर्ते जमा होतील.
  4. चौथी सभा- 14 मे 2023 रोजी रविवारी पुण्यातली सभा होईल. या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्यावर असेल. पुण्यातील शेकाप, समाजवादी पक्ष, सगळ्यांना सभेसाठी आमंत्रित केलं जाणार आहे.
  5. पाचवी सभा- 28 मे 2023 रोजी रविवारी कोल्हापुरात महाविकास आघाडीची सभा होईल. सतेज उर्फ बंटी पाटील हे पुढाकार घेतील.
  6. सहावी सभा- 3 जून 2023 रोजी नाशिकमध्ये शनिवारी पुढची सभा होईल. या ठिकाणी नंदुरबार, धुळे, नाशिक जळगाव आदी ठिकाणचे कार्यकर्ते नागरिक जमा होतील. या सभेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर असेल.
  7. सातवी सभा- 6 जून 2023 रोजी अमरावतीत होणार आहे. या सभेची जबाबदारी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मृग नक्षत्राच्या आधीचा हा दिवस असल्याने यावेळी पावसाची शक्यता आहे. पावसातील सभा ऐतिहासिक होतात. त्यामुळे काहीही झालं तरी सभा होणारच, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.