शहाण्या आमदार आहेस, तु मास्क वापरला तरच मला लोकांना सांगता येईल; अजित पवारांच्या रोहित यांना कानपिचक्या

कर्जत जामखेडला गेलो असता मला तिकडे कोणीच मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. आमच्या रोहितने पण मास्क घातले नव्हते, शेवटी मीच न राहून रोहितला म्हटले शहाण्या तु या मतदारसंघाचा आमदार आहेस, तुच जर मास्क नाही घातलेस तर मी लोकांना मास्क वापरण्यास कसे सांगू? असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

शहाण्या आमदार आहेस, तु मास्क वापरला तरच मला लोकांना सांगता येईल; अजित पवारांच्या रोहित यांना कानपिचक्या
राज्यातील 125 तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरीत
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 1:13 PM

पुणे : कर्जत जामखेडला गेलो असता मला तिकडे कोणीच मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. आमच्या रोहितने पण मास्क घातले नव्हते, शेवटी मीच न राहून रोहितला म्हटले शहाण्या तु या मतदारसंघाचा आमदार आहेस, तुच जर मास्क नाही घातलेस तर मी लोकांना मास्क वापरण्यास कसे सांगू? मी भाषण करताना कधीच मास्क काढत नाही, आणि तिथे मला एकानेही मास्क घातलेले दिसले नाही, असे म्हणत अजित पवार यांनी मास्कवरून रोहित पवार आणि उपस्थित लोकांना कानपिचक्या लगावल्या आहेत. ते बारामती तालुक्यातील धुमाळवाडीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

‘सर्वांनी कोरोनाचे नियम पाळा’

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आता रुग्ण कमी होत असल्याने शासनाकडून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. परंतु या सूटीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. देशातून अद्याप कोरोना हद्दपार झालेला नाही. त्यामुळे आपली एक चूक देखील महागात पडू शकते. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळा आणि तिसरी लाट टाळा असे पवार यांनी म्हटले आहे.

लसीकरणाचे आवाहन

कोरोनावर आजच्या स्थितीत सर्वोत्तम पर्याय काय असेल तर तो म्हणजे लसीकरण आहे. देशात जसजसे लसीकरण वाढत आहे, त्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी लसीचे दोनही डोस पूर्ण करावेत. ज्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली नाही, त्यांना कुठलीही सुविधा न देण्याचा निर्णय औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याच धर्तीवर आपल्याकडेही टोकाचे निर्णय घेण्यास भाग पाडू नका. सर्वांनी तातडीने लसीकरण करून घ्या, तसेच कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळा असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या 

MP: पंतप्रधान मोदींच्या स्वागतापूर्वी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह 110 मंत्री, आमदारांचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य

खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा; संजय राऊत यांचं आव्हान

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.