अजित पवारांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदे सुरतला गेल्यानंतर राष्ट्रवादीत काय घडलं होतं?

अजित पवार यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवारांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला.

अजित पवारांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदे सुरतला गेल्यानंतर राष्ट्रवादीत काय घडलं होतं?
ajit pawar and eknath shinde
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 7:17 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड पुकारत महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणला होता. एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसोबत सुरतला गेले होते. त्यानंतर पुढे ते गुवाहाटीला गेले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड घडामोडी घडत होत्या, अशी माहिती स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवारांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला.

“ही भूमिका ज्यावेळी एकनाथ शिंदे सुरतला गेले होते, तेव्हा अजित पवारांच्या चेंबरमध्ये सर्व राष्ट्रवादीचे आमदार एकत्र बसले. सर्वांनी एक पत्र साहेबांना दिलं. सर्वांनी सह्या केल्या. तिकडच्या लोकांनीही सह्या केल्या, ते पत्र राजेश टोपेंनी दिलं. ते राजेश टोपेंना खासगीत विचारा. दोन वर्ष कोरोनाची विकास झाला नाही. आता कुठे निधी मिळत आहे. आम्ही लोकांशी बांधिल आहोत. आम्हाला मतदारसंघता काम करायचं आहे. जसा शिवसेना राष्ट्रवादीसोबत आला. तर आपण भाजपसोबत जाऊ. तुम्ही २०१४ला भाजपला पाठिंबा दिला. २०१७ ला भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केला. २०१९ला तेच झालं. अचानक उठून कोणी पहाटेची शपथ घेईल का?”, असा सवाल अजित पवारांनी केला.

‘सर्वांचं मत होतं, नंतर आम्ही भूमिका घेतली’

“एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार चालत असताना राष्ट्रपती राजवट आली. ती मागे घेण्यात आली. राष्ट्रपती राजवट कुणी आणली? त्याची जरा माहिती घ्या. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्या. त्यासंदर्भात सारखं शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम करतो. २०१९मध्ये झालं. आपण पाच वर्ष पुढे आलो आहे. त्यावेळी प्रयत्न केला. सर्वांचं मत होतं. नंतर आम्ही भूमिका घेतली. तेव्हा आमच्या सोबत होते. पण नंतरच्या काळात घेऊ का नको अशा भूमिकेत होते. आमचं सरधोपट काम असतं. इकडे जायचं जायचं. तिकडे नाही नाही. रणनीती आम्हाला जमत नाही. आम्ही सरळमार्गी काम करणारे माणसं आहोत. काम करणारे माणसं आहोत. त्यामुळे इथपर्यंत आलो”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

“आमची विकासाची कामं करण्यासाठी राज्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी भाजपसोबत गेलो. देश पातळीवर टाकली तर दोन तीन लोकांची नावे पंतप्रधानपदाची नावे सांगा. ती सांगा. एक मोदी साहेब आहेत. समोरून नाव येत नाही. अनेकदा एकत्र बसले. म्हणतात नंतर ठरवू. आपण कुणाच्या हाती सूत्रे देणार आहोत हे जनतेला कळायला नको”, असं अजित पवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.