VIDEO: दादा प्रेसमध्ये थोडेच बोलले, बोलले ते थेटच, हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणून दाखवा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार बोलणं टाळलं.

VIDEO: दादा प्रेसमध्ये थोडेच बोलले, बोलले ते थेटच, हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणून दाखवा
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 9:05 PM

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार बोलणं टाळलं. पूजा आत्महत्या प्रकरण, संजय राठोडपासून अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच सरकारची भूमिका मांडली. मात्र, पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नसल्याचं वक्तव्य सांगत प्रश्न विचारला. यानंतर अजित पवार यांनी हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवावा, असं थेट आव्हान भाजपला दिलंय (Ajit Pawar challenge Devendra Fadnavis and BJP for trust vote in Assembly).

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलं, “सरकार पळ काढतंय असा आरोप विरोधकांनी केलाय. सरकारचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.” यावर अजित पवार म्हणाले, “जर त्यांना तसं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव दाखल करावा. वाजवून दाखवतो की किती आमदार आमच्या सोबत आहेत आणि किती त्यांच्यासोबत.”

“भाजप म्हणतंय आम्ही म्हणतोय तसा तपास करा, तसं होणार नाही”

उद्धव ठाकरे संजय राठोड प्रकरणी बोलताना म्हणाले, “न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसा होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिलाय.”

“गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत”

“प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले. गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ,” असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा

संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर; सीएम म्हणतात, तो काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही!

संजय राठोडांवर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, 10 मोठे मुद्दे

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar challenge Devendra Fadnavis and BJP for trust vote in Assembly

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.