अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? अमृता फडणवीस यांनी दिलं अचूक उत्तर

अजित पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत आपण आजही मुख्यमंत्री पदासाठी दावा करु शकतो, असं मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांनंतर अमृता फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? अमृता फडणवीस यांनी दिलं अचूक उत्तर
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 7:40 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत सातत्याने उलटसुलट चर्चांना उधाण येताना दिसत आहेत. अजित पवार राष्ट्रवादीत नाराज आहेत, ते आमदारांचा एक गट घेऊन भाजपसोबत जाऊ शकतात. राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना गेल्या काही दिवासांपासून उधाण आलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी आपण आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असणार असल्याचं म्हटलं आहे. पण अजित पवार यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. त्यामुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. या सगळ्या घडामोडींनंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना याबाबचत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का?

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी आपली भूमिका मांडली. “मला कोणीही मुख्यमंत्री झालं तर आवडेल. महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल”, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.

अजित पवार भाजपमध्ये आले आणि मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली तर?

अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर अमृता फडणवीस यांना यावर काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा, “मला वाटतं महाराष्ट्र आपला असा राज्य आहे जे खूप काही करू शकतं, खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्याला जनतेला, जी पार्टी पुढे येते, त्या पार्टीला ठीक वाटला, जर न्याय देऊ शकेल असं वाटलं, तर ते चांगलं आहे. तो कोणीही असला तरी चालेल”, असं चोख उत्तर अमृता फडणवीस यांनी यावेळी दिलं.

हे सुद्धा वाचा

‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री, अनेकदा डोळा मारतात’

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री खूप जवळची आहे का? असा प्रश्न नंतर अमृता यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. “ते त्या दोघांना जास्त माहिती आहे. राजकारणी लोक, त्यांची मैत्री असते, अनेकदा डोळे मारतात, खूप ठिकाणी डोळे मारतात”, असा मिश्किल टोला अमृता फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.