Ajit Pawar : अजितदादांपुढे चुकीला माफी नाही! कधी अधिकाऱ्यांची खरडपट्टी तर कधी कार्यकर्त्याला खडे बोल!

अजित पवारांनी सध्या अधिकाऱ्यांच्या कानउघाडणीचा सपाटा सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार कोयना धरण शेजारच्या विश्रामगृहात गेले होते. या विश्रामगृहाचं नुतनीकरण करण्यात आलं होतं. अजित पवार आत शिरताच सर्वात आधी सरसकट डबल बेड का, म्हणून त्यांनी अधिकाऱ्याला पहिला प्रश्न केला.

Ajit Pawar : अजितदादांपुढे चुकीला माफी नाही! कधी अधिकाऱ्यांची खरडपट्टी तर कधी कार्यकर्त्याला खडे बोल!
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 11:43 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपली कार्यपद्धती, निर्यणक्षमता, बिनधास्तपणा आणि सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात. त्यातच अजित पवारांनी सध्या अधिकाऱ्यांच्या (Officers) कानउघाडणीचा सपाटा सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार कोयना धरण शेजारच्या विश्रामगृहात (Rest house) गेले होते. या विश्रामगृहाचं नुतनीकरण करण्यात आलं होतं. अजित पवार आत शिरताच सर्वात आधी सरसकट डबल बेड का, म्हणून त्यांनी अधिकाऱ्याला पहिला प्रश्न केला. नंतर अजित पवारांचं लाईटसाठी काढलेल्या पॉईंटकडे लक्ष गेलं. एकाच खोलीत गरज नसतानाही असंख्य पॉईंट्स काढलेले होते. कारण, इलेक्ट्रिशयनला पॉईंट्प्रमाणे पैसे मिळतात, अजित पवारांनी त्या पॉईंट्सवरुनही चांगलीच खरडपट्टी काढली.

बाथरुम, टॉयलेटमधील फ्लशचीही पाहणी

नुतनीकरणानंतर बाथरुम, टॉयलेटमधले फ्लश व्यवस्थित चालतायत की नाही, याचीही पाहणी खुद्द अजित पवारांनी केली आणि पाहणीनंतरच्या कार्यक्रमात मात्र त्या अधिकाऱ्याला चांगलंच सुनावलं. तिकडे बुलडाणा दौऱ्यात अनेक ऐतिहासिक वास्तूंची अजित पवारांनी पाहणी केली. नव्या बांधकामाच्या हट्टामुळे पुरातन वास्तूंना धक्का तर लागला नाही ना, हे पाहण्यासाठी अजित पवारांनी चक्क टॉर्च घेऊन पाहणी केली.

‘शिवनेरीवर कसं बांधकाम झालंय, ते आधी बघून या’

बाहेरच्या आवारात जुन्या बांधकामावरुन तात्पुरती डागडूजी करण्यात आली होती. त्यावरुनही शिवनेरीवर कसं बांधकाम झालंय, ते आधी बघून या, असा सल्ला अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला. आजूबाजूला जुनं बांधकाम आणि मध्येच पेवर ब्लॉक टाकल्यामुळेही अजित पवारांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचं पाहायला मिळालं.

हे सुद्धा वाचा

झाडांवर पाय देणाऱ्यालाही सुनावलं

बांधकाम, झाडं, नुतनीकरण केलेल्या इमारती आणि स्वच्छता यावर अजित पवारांचं बारीक लक्ष असतं. बारामतीत फोटो काढण्याच्या नादात काहींनी झाडांवर पाय दिला होता. त्यावरुनही अजित पवार भडकले. शिवाय एका वास्तूबाहेरची झाडं काही लोक वारंवार तोडून नेत असल्याचं लक्षात आल्यानंतर जाहीर सभेतच अजित पवारांनी त्यावरुन भाष्यही केलं. त्यामुळे अजित पवार भले उपमुख्यमंत्रीपदावर असले, त्यांच्या हातात राज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी असली, तरी त्यांचं लक्ष हे अगदी बारिकसारिक गोष्टींकडेही असतं, हे लक्षात घ्यायला हवं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.