अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत संपूर्ण माहिती द्यावी, किरीट सोमय्यांचं आव्हान
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक, चालक आणि लाभार्थी कोण हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी अजित पवारांना दिलंय.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधिक कंपनी, कारखाने आणि विविध आस्थापनांवर आज आयकर विभागानं छापेमारी केली. या कारवाईवरुन अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का? असा सवाल अजित पवार यांनी केलाय. त्यावर आता भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक, चालक आणि लाभार्थी कोण हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी अजित पवारांना दिलंय. (Kirit Somaiya’s criticism of Ajit Pawar from Jarandeshwar Sugar Factory)
अजित पवार हे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी राजकारण करत आहेत. पण त्यांनी अर्थकारणावर बोलावं. किती कारखाने घेतले? किती भागधारक आहेत? असा सवालही सोमय्या यांनी यावेळी केलाय. मी जरंडेश्वर कारखान्याचा सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. खरा मालक, चालक आणि लाभार्थी अजित पवारांना माहिती आहे, असा दावा सोमय्यांनी केलाय. तसंच अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीनं विकत घेतल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
जरंडेश्वर कारखान्याच्या मालकाशी संबंध काय?
अजित पवार यांनी तुरुगांत असलेल्या जरंडेश्वर कारखान्याच्या मालकाशी काय संबंध आहेत हे स्पष्ट करावं. गुरु कमोडिटी यांना कारखाना खरेदीसाठी कुणी मदत केली? ओमकार बिल्डरला पैसे कुणी दिले? जरंडेश्वर कारखाना 40 वर्षासाठी लिजवर दिला. अजित पवार आणि शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं. घोटाळा लपवण्यासाठी वेगळी दिशा दिली जात आहे. संजय राऊत, मिलिंद नार्वेकरांकडून अजित पवारांनी शिकावं. दारामागून दाऊन ईडीच्या कार्यालयात दंडाची रक्कम भरली, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.
Ajit Pawar must disclose Who is Actual Owner (Beneficiary) of Jarandeshwar Sugar Karkhana ?
जरंडेश्वर साखर कारखाना चे असली मालक, चालक, लाभार्थी कोण!? अजित पवारांनी सांगावे @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/StPEwkQOf1
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 7, 2021
‘नवाब मलिकांच्या जावयाला पकडताना भाजप कार्यकर्ता होता का?’
ड्रग्स प्रकरण हे राज्याचा विषय आहे. सुशांत सिंग प्रकरणानंतर ड्रग्स प्रकरण पुढे आलं आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला पकडताना भाजप कार्यकर्ता होता का? अजित पवार, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांनी किती पैसे खाल्ले हे सांगावं. भाजपच्या कार्यकर्त्याने पैसे खाल्ले असतील तर कारवाई करावी, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलंय. ठाकरे सरकारकडे जो व्हिडीओ आहे त्यात चूक केली असेल तर सरकारनं कारवाई करावी, असंही सोमय्या म्हणालेत.
माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का? – अजित पवार
माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे, ज्यांची 35-40 वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं, असं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :
Breaking : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन! परिसरात मोठी खळबळ
मोहन डेलकरांचे कुटुंबीय हाती शिवबंधन बांधणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिवसेना प्रवेश
Kirit Somaiya’s criticism of Ajit Pawar from Jarandeshwar Sugar Factory