Ajit Pawar | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच ट्विटर, फेसबुकवर अजित पवार यांच्याकडून मोठे बदल
उपमुख्यमंत्री पदाची काही वेळेपूर्वीच अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत अजित पवार यांनी सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. फक्त शिवसेनाच नाही तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांच्यासोबत अनेक आमदार देखील फुटले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकिय भूकंप झालाय. अजित पवार (Ajit Pawar) यांनी परत एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीये. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडल्याचे बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) काही आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. हा एक प्रकारे मोठा झटका शरद पवार यांना नक्कीच असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन आठवड्यांपूर्वीच अजित पवार यांचा पत्ता कट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले होते. यामुळेच अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे शरद पवार यांनी अजित पवार यांना डावलून प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचा कार्याध्यक्ष बनवले. तेच आज प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीये. छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे पद सोशल मीडियावर अपडेट करण्यात आले आहे. ट्विटर, फेसबुकवर अजित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख हा करण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे माजी विरोधी पक्षनेते असाही उल्लेख सोशल मीडियावर करण्यात आला आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी फटाके फोडून कार्यकर्त्ये जल्लोष करताना दिसत आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष मोठा बघायला मिळतोय. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर बारामती शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसतोय.
बारामती शहरातील भिगवण चौकात फटाके वाजवत अजित पवार यांचे कार्यकर्त्ये जल्लोष करत आहेत. अजित पवार यांना 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचा मागच्या तीन वर्षांमध्ये हा तिसरा शपथविधी उपमुख्यमंत्री पदाचा आहे. मागच्या वेळी फक्त तीन दिवसांच्याच सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते.