Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट, शेतकऱ्यांना मदत, मंत्रिमंडळ विस्तार आणि….

आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली तसेच यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ही चर्चा झाल्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट, शेतकऱ्यांना मदत, मंत्रिमंडळ विस्तार आणि....
अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट, शेतकऱ्यांना मदत, मंत्रिमंडळ विस्तार आणि....Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 4:27 PM

मुंबई : राज्यातला महाविकास आघाडी सरकार जरी पडलं असलं तरी माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या चांगलेच ॲक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहेत. नवं सरकार राज्यात अस्तित्वात आलं, त्याचवेळी राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं होतं, अनेक भागात पूरस्थिती होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अजित पवारांनी तातडीने विदर्भ, मराठवाड्याचा रॅपिड फायर दौरा करत या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही भेट घेतली, त्यानंतर लगेच आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली तसेच यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ही चर्चा झाल्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची भेट

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते व विधीमंडळ सदस्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री येथे भेट घेऊन निवेदन दिले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार अनिल पाटील,आमदार दत्तामामा भरणे, आमदार सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते, अशी माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

मंगळवारी राज्यपालांचीही भेट घेतली

दौऱ्यांवरूनही शाब्दिक चकमक

राज्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकेही पाहायला मिळाल्या अजित पवार हे पूर ओसरल्यानंतर दौऱ्याला गेले ,अशी टीका करताना मुख्यमंत्री दिसून आले, तर मी दौऱ्याला कधी जातोय हे पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत करावी अशी मागणी अजित पवारांकडून ठेवण्यात आली. तर मंत्रिमंडळ विस्तावरावरूनही रोज शाब्दिक बाण सोडण्याचे काम सध्या सुरू आहे. यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची भिती वाटतेय त्यामुळेच हा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे, अशी टीका विरोधकांकडून रोज होत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.