Video : ‘परब शिवसेनेचे, तुम्ही शिवसेनेच्या… आता तुमचं तुम्ही बघून घ्या’, अजितदादांनी घेतली निलम गोऱ्हेंची फिरकी

निलम गोऱ्हे यांना कार्यक्रमस्थळी पोहोचायला काहीसा उशीर झाला. त्यानंतर बोलताना निलम गोऱ्हे यांनी अजित पवारांच्या वेळ काटेकोरपणे पाळण्याच्या सवयीवर मिश्किल टिप्पणी केली. मग अजितदादांनीही निलम गोऱ्हे यांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं.

Video : 'परब शिवसेनेचे, तुम्ही शिवसेनेच्या... आता तुमचं तुम्ही बघून घ्या', अजितदादांनी घेतली निलम गोऱ्हेंची फिरकी
नीलम गोऱ्हे, अजित पवारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 10:53 AM

पुणे : एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’चं लोकार्पण आज करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), परिवहन मंत्री अनिल परब, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आदी नेते उपस्थित होते. वेळेबाबत पक्के असलेले अजित पवार कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधीच कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यानंतर अनिल परबही (Anil Parab) पोहोचले. मात्र, निलम गोऱ्हे यांना कार्यक्रमस्थळी पोहोचायला काहीसा उशीर झाला. त्यानंतर बोलताना निलम गोऱ्हे यांनी अजित पवारांच्या वेळ काटेकोरपणे पाळण्याच्या सवयीवर मिश्किल टिप्पणी केली. मग अजितदादांनीही निलम गोऱ्हे यांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं.

निलम गोऱ्हेंची मिश्किल टिप्पणी

निलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या की, ‘तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, कार्यशील आहात. आमच्याही प्रश्नांना तुम्ही वेगाने न्याय मिळवून देता. पण कार्यक्रम पुण्यात असतो त्यावेळी मी आता विचार करत आहे की संयोजकांना सांगावं का, की आदल्या दिवशी आमची झोपायची व्यवस्था इथे करा. कारण कितीही तुमच्यापेक्षा लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही आमच्या आधीच येऊन पोहोचलेले असता. 9 वेळ म्हटल्यावर पावणे नऊला पोहोचलं तर दादा साडे आठला हजर असतात. अशी त्यांची कार्यक्षमता आहे. पण त्यामुळे होतंय काय की आम्ही उशिरापर्यंत झोपतो असा त्याचा अर्थ नाही’.

अजित पवारांनी फिरकी घेतली!

‘निलमताईंनी मघाशी बोलताना थोडं वेळेचं सांगितलं. मी लवकर आलो पण आम्ही 9 वाजेपर्यंत थांबायचं ठरवलं होतं. आम्ही इथे गोल खुर्च्या ठेवून बसलेलो होतो. लवकर आल्यानंतर काय करायचं तर थोडीशी चर्चा करता येते. त्यामुळे तुम्ही वेळेतच आलात, तुम्ही एकदम परफेक्ट टाईमिंगला आलात त्यामुळे काळजी करु नका. तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो पण परबसाहे म्हणले आता वेळ व्हायला आला आहे आपण सुरु करु. त्यामुळे त्यांनीच सुरु केलं लवकर. मी म्हणालो होतो की निलमताई येत आहेत, त्या उपसभापती आहेत, 9 वाजेपर्यंत थांबलं पाहिजे. पण परबसाहेबांनी ऐकलं नाही त्याला मी काय करणार. आता ते शिवसेनेचे, तुम्ही शिवसेनेच्या… बघा तुमचं तुम्ही काय ते’, अशा शब्दात अजित पवार यांनी निलम गोऱ्हे यांची फिरकी घेतली. त्यावेळी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

हे सुद्धा वाचा

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....