शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अजितदादांनी फक्त तोंडी निषेध केला नाही, सदाभाऊंना थेट फोन करुन म्हणाले…

नवाब मलिकांच्या रॅलीत सहभाही हेणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी हो असं उत्तर दिलं. "आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. घड्याळ चिन्ह दिलं आहे. नवाब मलिकांवर आरोप झाले. पण ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. आरोप सिद्ध झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही"

शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अजितदादांनी फक्त तोंडी निषेध केला नाही, सदाभाऊंना थेट फोन करुन म्हणाले...
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 10:50 AM

‘महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?’ असं वादग्रस्त वक्तव्य काल सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल केलं. त्यावर आज अजित पवार पुन्हा बोलले. “खरंतर तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुस्कृंत राजकारण कसं करायचतं असतं हे दाखवलं. विरोधकांबद्दल बोलताना पातळी कशी सोडायची नसते. कमरेखालची टीका कशी करायची नसते. आरोप-प्रत्यारोप होत असतात, पण ते मांडण्याची एक पद्धत असते. हे सगळं त्यांनी आपल्याला शिकवलं” असं अजित पवार म्हणाले. “हीच पद्धत पुढे वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पवारसाहेब, विलासराव देशमुख यांनी पुढे चालू ठेवली. पण काल जे वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे. मी काल तीव्र शब्दात निषेध केला. मी एवढ्यावरच थांबलो नाही. मी त्यांना फोन केला, त्यांना म्हटलं तुम्ही जे स्टेटमेंट केलं, ते आम्हाला कोणाला आवडलेलं नाही. कोणाविषयी व्यक्तीगत बोलणं ही आपली पद्धत नाही. त्याबद्दलचा निषेध केला आहे” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“पवार साहेबांबद्दल पुन्हा असं घडता कामा नये. इथून पुढे महाराष्ट्रात अनेक नेते मंडळी येतील, वक्ते येतील, राष्ट्रीय नेते येतील. असं कोणाबद्दल बोलू नये. तुमची विचारधारा वेगळी असू शकते. मतमतांतर असू शकतात. पण हे मांडताना ताळमेळ असला पाहिजे. हा विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रकार आहे” असं अजित पवार म्हणाले. “मी सदाभाऊ खोत यांना सांगितलं. तुम्ही चुकीच बोललात. तुम्ही असं बोलून नवीन प्रश्न निर्माण करु नका. वडिलधाऱ्यांबद्दल अशी वक्तव्य महाराष्ट्र सहन करणार नाही. आम्हाला मान्य नाही” असं अजित पवार म्हणाले.

नवाब मलिकांच्या रॅलीत सहभागी हेणार का?

नवाब मलिकांच्या रॅलीत सहभागी हेणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी हो असं उत्तर दिलं. “आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. घड्याळ चिन्ह दिलं आहे. नवाब मलिकांवर आरोप झाले. पण ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. आरोप सिद्ध झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही” असं अजित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून गोपनीयतेचा भंग केला का? यावर अजित पवारांनी माहिती अधिकारात हे सर्व पहायला मिळतं असं उत्तर दिलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.