AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला कुणाशीही काही बोलायचं नाही’ पार्थ पवारांविषयी बोलण्यास अजित पवारांचा नकार

बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे (Ajit Pawar on Sharad Pawar and Parth Pawar).

'मला कुणाशीही काही बोलायचं नाही' पार्थ पवारांविषयी बोलण्यास अजित पवारांचा नकार
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 12:43 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच यावर अजित पवार यांची भूमिका काय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र, बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे (Ajit Pawar on Sharad Pawar and Parth Pawar). मला कुणाशीही काही बोलायचं नाहीय. मला माझं काम करायचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणलंय, असं म्हणत अजित पवारांनी पार्थ पवार प्रकरणावर बोलण्याचं टाळलं.

हेही वाचा : शरद पवार म्हणाले, तो इमॅच्युर, आता पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया…..

अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. बारामती मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार बारामतीत आहेत. विशेष म्हणजे पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

“पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत कुटुंबाची बैठक”

पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार असे सर्वजण उपस्थित होते. या संयुक्त चर्चेत पार्थची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न केले. अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात ही शनिवारी (15 ऑगस्ट) रात्री ही बैठक झाली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मागील काही दिवसांपासून पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार नाराज असल्याचे तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, पार्थ पवार यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, पवार कुटुंबातील मतभेद मिटणार की याला वेगळं वळण मिळणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारले जात आहेत.

पवारांनी नातवाला इमॅच्युअर म्हटलं, आता नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

दरम्यान, शनिवारी (15 ऑगस्ट) पार्थ पवार एकटेच काका श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवारांच्या भेटीला गेले होते. पवार कुटूंबियांकडून पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला

पार्थ पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत, शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं : संजय राऊत

पवारांच्या नातवाच्या समर्थनार्थ पद्मसिंहांचा नातू मैदानात, पार्थ यांना फायटरची उपमा

Ajit Pawar on Sharad Pawar and Parth Pawar

सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....