महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात?, शरद पवार भूकंप कसा रोखणार?
अजित पवार यांनी पक्षात बंड केलं आहे. त्यांच्यासोबत 30 ते 40 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे जवळपास सर्व पक्षच अजित पवार यांच्यासोबत गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे शरद पवार हे पक्षातच मायनॉरिटीत गेले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाला हादरा देणारी बातमी आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात बंड केलं आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, आता शरद पवार हे पक्षातील बंड कसं रोखतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांनी पक्षात बंड केलं आहे. त्यांच्यासोबत 30 ते 40 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे जवळपास सर्व पक्षच अजित पवार यांच्यासोबत गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे शरद पवार हे पक्षातच मायनॉरिटीत गेले आहेत. शरद पवार यांच्या सोबत केवळ 15 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्याने महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मागच्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांचं बंड मोडून काढलं होतं. आता पवार हे बंड कसं मोडून काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीने एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याआधीच राष्ट्रवादीत फूट पडल्याने राष्ट्रवादी पक्ष कमकुवत झाला आहे. राष्ट्रवादीचे खासदारही अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. राष्ट्रवादीतील या फुटीने महाविकास आघाडीवर मोठा परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पवार म्हणाले पाठिंबा नाही
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या शपथविधीला आमचा पाठिंबा नाही, असं स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे दिल्लीत होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसही दिल्लीत होते. त्याचवेळी या तिघांमध्ये सरकार स्थापण्याचं ठरलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तीन बैठकांनी राजकारण ढवळलं
राज्यात आज तीन बैठका झाल्या. एक बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी झाली. दुसरी बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर तिसरी बैठक ही देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेली बैठक ही मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक असल्याचं सांगितलं जात होतं. राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार असल्याची कुणाला कुणकुणही नव्हती. मात्र, दुपारनंतर अचानक घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली.
अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ किरण लहमाटे सरोज अहिरे अशोक पवार अनिल पाटील सुनिल टिंगरे अमोल मिटकरी दौलत दरोडा अनुल बेणके रामराजे निंबाळकर धनंजय मुंडे निलेश लंके मकरंद पाटील
मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असलेली नावे
छगन भुजबळ हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे आदिती तटकरे अनिल भाईदास पाटील बाबुराव अत्राम संजय बनसोडे