‘या’ जागांची होणार अदलाबदली, अजितदादांनी थेट सांगितलं; या फॉर्म्युल्याने आमदारांची डोकेदुखी?

लाडकी बहीण योजना असो की इतर योजना... या योजना कायमच्या कशा चालतील याचं आमचं नियोजन आहे. आम्ही विचार करून योजना काढल्या आहेत. या योजना चालू राहतील. मी शब्दाचा पक्का आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आमचं सरकार फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारधारेनं सुरू आहे. तुमच्या योजना सुरूच राहतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

'या' जागांची होणार अदलाबदली, अजितदादांनी थेट सांगितलं; या फॉर्म्युल्याने आमदारांची डोकेदुखी?
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 1:58 PM

विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यातील इतर पक्षांनी जोरदार तयार केली आहे. महायुतीने तर सीट शेअरिंगबाबत प्राथमिक बोलणीही केली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच कोणत्या जागांवर अदलाबदली होणार आहे, याची माहितीही अजितदादांनी दिल्याने महायुतीतील आमदारांची चांगलीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीची जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं. साधारणपणे सिटींग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. पण त्यात काही जागांची अदलाबदल होणार आहे. आता एखादा सिटिंग आमदार असेल. पण त्याच्या तुलनेत दुसऱ्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असेल तर ती जागा दुसऱ्या पक्षाने लढवायची, असं आमचं ठरलं आहे. पण ज्या उमेदवाराला ही जागा दिली जाणार आहे, तो तुल्यबळ असावा. त्याची निवडून येण्याची क्षमता असावी हे आम्ही पाहणार आहोत. याबाबतच आमच्या तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. म्हणजे या निवडणुकीत महायुतीत सिटिंग उमेदवारांची जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना टेन्शन येणार असल्याचं बोललं जात आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी देणार

अजितदादा यांनी आम्हीही तरुणांना संधी देणार असल्याचं स्पष्ट केलं. आमच्या पक्षात अनेक तरुण आहेत. कितीतरी तरुणांची नावे मी सांगू शकतो. आता आम्ही निर्णय घेताना काही सिटिंग आणि नव्या जागांच्या ठिकाणी नवे चेहरे देणार आहोत. मीही युवाशक्तीला संधी देण्याचं काम करत आहे. मी तरुणपणी खासदार झालो, तेव्हापासून आतापर्यंत मी तरुणांना संधी देत आलो आहे. आताही तुम्ही पाहिलं असेल आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्यात आम्ही अनिल भाईदास पाटील आणि आदिती तटकरे आदी नवे चेहरे दिले. आम्ही सर्व समाजाला संधी देत आहोत, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.

फेक नरेटिव्ह तयार केला

वेष बदलून गेल्याच्या चर्चांवरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी जर गप्प बसलो तर लोकांना वाटतं हे बोलत नाहीत. त्यामुळे माझ्या बाबत उठलेल्या वावड्या खऱ्या वाटू लागतात. मध्येच मोठी पेपरबाजी चालली. मी कुठे 10 वेळा अमित शाह यांना भेटलो? आपण लोकशाहीत वावरतो. मला कुठे जायचं म्हटलं तर लपूनछपून जाण्याचं कारण नाही. मी उजळ माथ्याने जाईल. मी स्पष्ट असेल ते बोलतो. पण वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या दाखवल्या जात आहेत. आम्ही चांगलं काम करतो ते बघवत नाही. आम्ही चांगल्या योजना आणतो ते बघवत नाही. त्यामुळे फेक नरेटिव्ह तयार केला जात आहे. ज्या बातम्या आल्या त्यात तथ्य नाही. मला जायचं असेल तर मी उघडपणे जाईल. मला त्यासाठी कुणाला घाबरण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.

तर राजकारणातून संन्यास घ्यावा

माझं संसदेला आव्हान आहे. पाहावं आणि तपासावं. मी जर वेश बदलून गेल्याच्या आरोपात तथ्य असेल तर मी राजकारणातून बाहेर जाईल. खरं नसेल तर, कोणतीही माहिती नसताना ज्यांनी माझ्यावर आरोप केल्याने त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.