पवार कुटुंबातून 4 जण लोकसभा लढणार? अजित पवार म्हणतात…
मुंबई : पवार कुटुंबातील चार जण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु असताना, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अखेर या चर्चांवर पडदा टाकला आहे. पवार कुटुंबातून चौघेजण लोकसभेच्या रिंगणात उतरतील, या चर्चेत तथ्य नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिलं. अजित पवार नेमकं काय म्हणाले? पवार कुटुंबातून चौघेजण […]
मुंबई : पवार कुटुंबातील चार जण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु असताना, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अखेर या चर्चांवर पडदा टाकला आहे. पवार कुटुंबातून चौघेजण लोकसभेच्या रिंगणात उतरतील, या चर्चेत तथ्य नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
पवार कुटुंबातून चौघेजण लोकसभा लढवतील, या चर्चेत काहीच तथ्य नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
यावेळी, पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याबाबत अजित पवारांना विचारले असता, ते म्हणाले, “आता बारामती लोकसभा मतदारसंघात मी जातो. पण तिथून काय निवडणूक लढवणार आहे? सुप्रिया सुळे तिथून लढणार. जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ किंवा मी राज्यभर फिरतो, म्हणजे आम्हाला सगळीकडून लढायचंय असं नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही दौरे करतो. जबाबदारी असते. पक्षाची भूमिका लोकांना सांगता येते.”
पार्थ पवार मावळच्या रणांगणात, पदाधिकाऱ्यांच्या गुप्त भेटीगाठी सुरु
पवार कुटुंबातील ‘या’ चौघांची नावं चर्चेत
माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार, असे चार जण पवार कुटुंबातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यची चर्चा सुरु होती. त्यावर अखेर अजित पवारांनी पडदा टाकला आहे.
VIDEO : अजित पवारांशी खास बातचीत