AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरीश बापट हे भाजपचे खासदार नाहीत तर…. : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात भाजप खासदार गिरीश बापट यांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या.

गिरीश बापट हे भाजपचे खासदार नाहीत तर.... : अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 7:52 PM

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात भाजप खासदार गिरीश बापट यांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या. ते संवाद पुणे आयोजित ‘प्रबोधन’चा शतकोत्सव या कार्यक्रमाच्या समारोपात बोलत होते. गिरीश बापट यांचा विचार काँग्रेस सारखा आहे. त्यामुळेच त्यांचे सर्व पक्षात संबंध असल्यानेच ते आमदार, खासदार म्हणून निवडून येतात, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं (Ajit Pawar say Girish Bapat is not MP of BJP in Pune).

अजित पवार म्हणाले, “आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते. ते ताजी-ताजी गोष्ट लक्षात ठेवतात, मात्र नंतर त्याचे परिणाम दिसतात. प्रबोधनकार यांनी ठाकरे शैली निर्माण केली. निर्भीड, परखडपणे बोलण्यासाठी ठाकरे शैली समोर आली. गिरीश बापट यांचा विचार काँग्रेस सारखा आहे. गिरीश बापट भाजपचे खासदार नाही, तर पुणेकरांचे खासदार आहेत. सर्व पक्षात त्यांचे संबंध म्हणून ते आमदार, खासदार म्हणून निवडणूक येतात.”

‘पूर्वनियोजित कार्यक्रम बदलायचा की नाही हे राज्यपालांनी ठरवावं’

दरम्यान, अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शेतकरी मोर्चाबद्दलच्या वर्तनावरही टीका केली. राज्यपालांना बऱ्याच दिवसांपूर्वी शेतकरी नेत्यांना भेटायचं असल्याचा निरोप देण्यात आला होता. ज्यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न असतो त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रम बदलू शकतो हे त्यांनी ठरवायचं असतं. मात्र, राज्यपालांबद्दल मी काही बोलणं योग्य वाटत नाही,” असंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.

‘आंदोलन करताना नियमांचे पालन केले नसेल, तर पोलिसांना नाईलास्तव गुन्हे दाखल करावे लागतात’

विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढल्यामुळे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. सांगली आणि कोल्हापूरमध्ये रॅली काढणारे सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे लोकं असोत, मात्र आंदोलन करताना नियमांचे पालन केले नसेल, तर पोलिसांना नाईलास्तव गुन्हे दाखल करावे लागतात, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

पूर्वनियोजित कार्यक्रम बदलायचा की नाही हे राज्यपालांनी ठरवावं : अजित पवार

विमानतळ बारामतीला पळवल्याचा शिवतारेंचा आरोप, अजित पवार म्हणतात ‘विषय खूप पुढे गेलाय’

Ajit Pawar | अजित पवारांची एक भेट आणि काम फत्ते

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar say Girish Bapat is not MP of BJP in Pune

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.