Maharashtra Assembly Session 2022 : आतापर्यंत जावई हट्ट पुरवलाय, आता सासऱ्यांकडील लोकांवर अन्याय करू नका; अजित पवारांचे चिमटे

Maharashtra Assembly Session 2022 : अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना भाजपला टोले लगावले. मोदी येण्याआधी भाजप या राज्यात येण्याची काहीच शक्यता नव्हती. पण मोदी लाटेनंतर सर्वच बदललं. आता आमच्याकडूनच गेलेली जास्त लोकं भाजपात दिसतात.

Maharashtra Assembly Session 2022 : आतापर्यंत जावई हट्ट पुरवलाय, आता सासऱ्यांकडील लोकांवर अन्याय करू नका; अजित पवारांचे चिमटे
मुख्यमंत्री पदाच्या निवडीनंतर भाजपामध्योही नाराजी असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 1:24 PM

मुंबई: राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या अध्यक्षांचं अभिनंदन केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारही (ajit pawar) बोलण्यास उभे राहिले. राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. त्यांचे सासरे हे विधानसभेचे सभापती आहेत. हाच धागा पकडून अजित पवार यांनी टोलेबाजी करत चिमटे काढले. आम्ही जावई हट्ट पुरवत आलोय. आता त्याची तुम्हाला परत फेड करावी लागेल. आता आमचा हट्ट पुरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सासऱ्यांकडील लोकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असं अजित पवार यांनी सभागृहात म्हणताच एकच खसखस पिकली. राहुल नार्वेकर जिथे जातात तिथल्या पक्षनेतृत्वाला ते आपलसं करून टाकतात. ते शिवसेनेत होते. तेव्हा आदित्य ठाकरेंना आपलसं केलं. त्यानंतर ते आमच्याकडे आले तर मलाही आपलसं केलं. भाजपमध्ये गेल्यावर त्यांनी फडणवीसांना आपलसं करून घेतलं. आता ते शिंदे साहेब तुमचं काही खरं नाही, असं पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करताना भाजपला टोले लगावले. मोदी येण्याआधी भाजप या राज्यात येण्याची काहीच शक्यता नव्हती. पण मोदी लाटेनंतर सर्वच बदललं. आता आमच्याकडूनच गेलेली जास्त लोकं भाजपात दिसतात. समोर आमच्याकडचीच दिसतात. हे पाहून मला भाजपातील मूळ मान्यवरांचं वाईट वाटतं. पहिली लाईनच जरी तुम्ही पाहिली, तरी तुमच्या लक्षात येईल. दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झालेत, त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलेलं नाही, असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.

हे सुद्धा वाचा

गिरीशचं अजून रडलं थांबलं नाही

फडणवीसांनी शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करतात भाजपची लोकं इतकी रडायला लागली. गिरीश (महाजन) यांचं तर रडणं थांबलेलंच नाही. ते अजूनही रडत आहे. गिरीश तर फेटा सोडून डोळ्यालाच लावतो की काय असं झालं होतं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता, असा चिमटा काढतानाच कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक आहेच. प्रत्येकानं सदसदविवेक बुद्धीला विचारून सांगा, की मनाला शांती झालीये का… असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना केला.

होय की नाही आदित्य?

चंद्रकात पाटील यांना बाका वाजवू नये, त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही याची काही शाश्वती नाहीये, असाही टोला अजित पवारांनी लगावला. एकनाथ शिंदे तुम्ही एकदा माझ्या कानात जरी सांगितलं असतं, तर आम्हीच तुम्हाला तिथे बसायला सांगितलं असतं. होय की नाही आदित्य?… असा सवाल अजित पवार यांनी केला.

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.