सुनेत्रा पवार यांचा पैठणीचा खेळ अन् अजित पवार यांच्यावर असा घेतला उखाणा Video

sunetra pawar lok sabha Election 2024 | अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. यावेळी त्या खेळ पैठणीचा ही खेळला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उखाणा ही घेतला.

सुनेत्रा पवार यांचा पैठणीचा खेळ अन् अजित पवार यांच्यावर असा घेतला उखाणा Video
sunetra pawar
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 6:48 AM

सुनिल थिगळे, शिरुर, पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पवार कुटुंबियांच्या पुणे जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बारामती बुथ मेळाव्यात अजित पवार यांनी शुक्रवारी भाषण केले. त्यात त्यांनी भावनिक भाषण केले. बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यामुळे आता पवार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राजकारणात सक्रीय झाल्याच्या दिसत आहेत. अनेक ठिकाणी त्या दौरे करत आहेत. शिरुरमधील शिक्रापूरमध्ये सुनेत्रा पवार चांगल्याच रंगल्या होत्या.

सुनेत्रा पवार सार्वजनिक कार्यक्रमात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले सर्व लक्ष पुणे जिल्ह्याकडे केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत करणारच असल्याचे जाहीर आव्हान केले होते. अमोल कोल्हे यांनीही हे आव्हान स्वीकारले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या कुटुंबियांकडूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहे. शिरुरमधील अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहे. सुनेत्रा पवार या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या.

हे सुद्धा वाचा

सुनेत्रा पवार खेळल्या पैठणीचा खेळ

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या.  यावेळी त्या खेळ पैठणीचा ही खेळला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उखाणा ही घेतला.

”महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून

अजितरावांचे नाव घेते तुमचे सर्वांचा मान राखून”

पार्थ पवार शिरुरमधून लढणार ?

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उतरवण्याची शक्यता आहे. या जागेवर सध्या महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या जागेचा तिढा सुटण्याआधीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बॅनरबाजी बाजी सुरु केली आहे.

हे ही वाचा

बारामतीत घरातील सर्व माझ्याविरोधात, मला एकटे पाडणार पण…अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भावनिक

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.