अजित पवार यांचे मुस्लिम कार्ड, शिवसेना- भाजपसोबत असताना विधानसभेचे सूत्र असे ठरवले

विधानसभेत दहा टक्के मुस्लीम समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. आपणास शंभर जागा मिळाल्यास त्यातील दहा जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला.

अजित पवार यांचे मुस्लिम कार्ड, शिवसेना- भाजपसोबत असताना विधानसभेचे सूत्र असे ठरवले
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 2:04 PM

राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हिंदुत्वादी पक्ष म्हटले जात आहेत. त्याचवेळी महायुतीमधील पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विधानसभेसाठी मुस्लिम कार्ड बाहेर काढले आहे. विधानसभेत दहा टक्के मुस्लीम समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. आपणास शंभर जागा मिळाल्यास त्यातील दहा जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. हिंदुत्वावादी महायुतीत असताना अजित पवार यांनी काढलेले मुस्लिम कार्ड भाजप-शिवसेनेसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे धोरण जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा टक्के मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, बारामतीत शक्ती अभिमान राबवणार आहे. या अभियानातंर्गत शक्ती तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. तसेच 24 बाय 7 असा मोबाईल नंबर सेवेत ठेवणार आहे. शक्ती कक्षची उभारणी करण्यात येणार आहे. शक्ती नजर केंद्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

बारामतीत दादागिरी चालणार नाही…

बारामतीमध्ये बाहेरून येणारे लोक दादागिरी करीत आहेत. बारामतीत ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बुधवारी माझी बैठक झाली. मी मागितलेल्या वेळेनुसार ही बैठक झाली. ही बैठक युतीची नव्हती. बैठकीत मी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले. मी ठरवले आहे की आता कुणावर टीका करायची नाही.

हे सुद्धा वाचा

दुधाला 7 रुपये अनुदान मिळणार

1 आक्टोंबरपासून दुधाला 7 रुपये अनुदान मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांचे बारामतीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहे. त्यावर ते म्हणाले, भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. आता बारामतीत बोर्ड लावण्याचे फॅड आले आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने एक कमिटी नेमली आहे. धनगर समाज ओबीसीमध्ये होता. त्यांना त्यांना एनटीमध्ये टाकले. आता त्यांची मागणी एसटीमध्ये टाकण्याची आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी मिळत नाही, असे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र भुयार यांनी चुकीचे वक्तव्य केले आहे. बोलताना ते चुकलेला आहेत. त्या बद्दल त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.