मुंबई : आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मेटे हे मुंबईला मराठा समन्वय समितीची बैठकीसाठी येत असताना खोपोली येथील बोगद्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर विनायक मेटे यांना पनवेलच्या (Panvel) एमजीएम रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, यादरम्यान मेटेंचे निधन झाले. मेटेंच्या अशा अचानकपणे जाण्याने सर्वचजण धक्कामध्ये आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात एक अत्यंत मोठे विधान केले.
अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना विनायक मेटेंच्या अपघातावर एक मोठे विधान केले आहे. अजित पवार म्हणाले की, रात्रभर विनायक मेटेंचा प्रवास सुरू होता. त्यांना सकाळी बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल व्हायचे असल्यामुळे रात्रीचा प्रवास सुरू होता. माझ्या म्हणण्यानुसार रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी आणि त्यामध्येच हा अपघात घडला असावा, असे अत्यंत मोठे विधान हे अजित पवार यांनी केले आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चारच दिवसांपूर्वी सकाळी आठ वाजता विनायक मेटे माझ्या भेटीला आले होते आणि त्यांनी मला एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आणि त्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील येणार होते. हा कार्यक्रम 16 तारखेला होता. विनायक मेटे हे मराठा समाजाच्या न्यायासाठी आणि आरक्षणासाठी झगटणारे नेते होते. सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते नेहमीच मराठा समाजाचे प्रश्न घेऊन येत आणि ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिलायं.