संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन पत्रकार तुमची वाट बघतायत : अजित पवार

वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार याचंं मिश्किल उत्तर

संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन पत्रकार तुमची वाट बघतायत : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 3:59 PM

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जात आहे. पूजाने आत्महत्या केलेल्या घटनेपासून संजय राठोड माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे संजय राठोड यांच्यावरुन विरोधकांनीही सरकारला आणि खासकरुन शिवसेनेला धारेवर धरलंय. या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन की सर्व पत्रकार तुमची आत्मितयेतेने वाट बघत आहेत. त्यांची एकदा भेट घ्या, अशी मिश्किल टिप्पणी केलीय.(Ajit Pawar’s mischievous answer to question about Sanjay Rathod)

पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यापासून संजय राठोड गायब आहेत. अद्याप ते माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे ते समोर कधी येतील? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. तेव्हा त्यांची भेट झाल्यानंतर आपण त्यांना तुमची भेट घेण्यास सांगू, असं उत्तर अजितदादांनी दिलंय. तसंच या प्रकरणात पोलीस योग्य तपास करतील आणि सत्य समोर आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. इतकच नाही तर एकेकाळी एखादा आरोप झाल्यावर लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा द्यायचे. पण आता तो काळ राहिला नसल्याचं अजितदादा म्हणाले.

..तर संजय राठोड यांची चौकशी करणार- पुणे पोलीस

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तब्बल 12 दिवसानंतर मोठं विधान केलं आहे. आवश्यकता असल्यास वन मंत्री संजय राठोड यांचीही चौकशी करण्यात येईल, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना हे विधान केलं आहे. आवश्यकता असल्यास पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांची चौकशी करण्यात येईल. आम्ही या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास करत आहोत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

राठोड समोर येणार?

पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले आहेत. तरीही गेल्या 12 दिवसांपासून राठोड मीडियासमोर आलेले नाहीत. त्यांनी आपली बाजूही मांडलेली नाही. मात्र, आता पुणे पोलिसांनी त्यांच्या चौकशीचे सुतोवाच केल्याने राठोड सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

गुन्हा दाखल नाही

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला 12 दिवस झाले तरी पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच या प्रकरणी काल अरुण राठोड नावाच्या तरुणाला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. पण पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळल्याने या प्रकरणी पोलीस कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेत याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.

संबंधित बातम्या :

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

Ajit Pawar’s mischievous answer to question about Sanjay Rathod

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.