अकबरुद्दीन ओवेसींची प्रकृती गंभीर, लंडनमध्ये उपचार सुरु
लंडन : एमआयएमचे प्रमुक असदुद्दीने ओवेसी यांचे लहान भाऊ आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 20 दिवसांपासून अकबरुद्दीन ओवेसी लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आणखी काही दिवस अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु राहणार आहेत. 2010 साली अकबरुद्दीन ओवेसी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या […]
लंडन : एमआयएमचे प्रमुक असदुद्दीने ओवेसी यांचे लहान भाऊ आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 20 दिवसांपासून अकबरुद्दीन ओवेसी लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आणखी काही दिवस अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु राहणार आहेत.
2010 साली अकबरुद्दीन ओवेसी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या शरीरातील आयर्न कंटेट कमी झाला होता.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपला भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनीही ट्विटरवरुन म्हटलं की, “अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.”
Praying for the speedy recovery and good health of Akbaruddin Owaisiji.
— YS Jagan Mohan Reddy (@ysjagan) June 11, 2019
कोण आहेत अकबरुद्दीन ओवेसी?
अकबरुद्दीन ओवेसी हे आंध्र प्रदेशमधील चंद्रयानगुट्टा विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे आमदार आहेत. 1999, 2004, 2009, 2014, 2018 सलग पाच वेळा ते विधानसभा निवडणुकीत हैद्राबादमधून निवडून आलेत. एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असरुद्दीन ओवेसी यांचे ते लहान भाऊ आहेत.
अकबरुद्दीन ओवेसी यांनी लेखिका तस्लिमा नसरीन यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अकबरुद्दीन ओवेसी नेहमी वादग्रस्त भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. अकबरुद्दीन ओवेसी हे त्यांच्या भाषणात नेहमी पाकिस्तानचे नाव घेत असतात. त्यांनी 26/11 ला मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबला बच्चा असे संबोधले होते.