कमल हसनला गांधींजींकडे पाठवण्याची तयारी झाली : हिंदू महासभा

मेरठ (उत्तरप्रदेश) : “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली.” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसनने यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारणात आणखी एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान “नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणाऱ्या कमल हसनला आम्ही गांधींजीकडे […]

कमल हसनला गांधींजींकडे पाठवण्याची तयारी झाली : हिंदू महासभा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मेरठ (उत्तरप्रदेश) : “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली.” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसनने यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारणात आणखी एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान “नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणाऱ्या कमल हसनला आम्ही गांधींजीकडे पाठवू”, अशी धमकी अखिल भारतीय हिंदू महासभेने दिली आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी मेरठमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी त्यांना कमल हसन यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला उत्तर देताना, “नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणारे लोक मूर्ख आणि हिंदू नावावर कलंक आहेत. कमल हसनसारखे लोक घाणेरडं राजकारण करत असून ते स्वत:चा ‘वध’ करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी म्हटलं.

“भारतात कमल हसन, फारुख अब्दुल्ला, नवज्योत सिंह सिद्धू आणि मेहबूबा मुफ्ती यांसारखे राजकारणी दहशतवाद्यांना पाठबळ देतात. दहशतवाद्यांची पाठराखण करण्याचं कामही हेच राजकारणी करत असतात, असेही अभिषेक यांनी सांगितलं.

राजकारणात नव्याने सक्रीय झालेले काही लोक प्रसिद्धीसाठी नथुराम गोडसेंना दहशतवादी ठरवत आहेत. नथुराम गोडसेंना दहशतवादी ठरवणारे कमल हसन यांचा उद्या कोणी जीव घेतला, तर ते त्यासाठी स्वत: जबाबदार असतील. नथुराम गोडसे हे हिंदू समाजाचा कायमच आदर्श होते आणि राहतील. त्यामुळे त्यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या कमल हसनला आम्ही महात्मा गांधींजीकडे पाठवू. विशेष म्हणजे कमल हसन यांना महात्मा गांधींकडे पोहोचवण्याची तयारीही झाल्याचे हिंदू महासभेचे प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरणं काय?

अभिनय क्षेत्रातून राजकीय आखाड्यात उतरलेल्या कमल हसनने तामिळनाडूतील अरावकुरीची इथं प्रचारसभेत बोलताना “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली”, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “हा मुस्लिमबहुल परिसर आहे म्हणून मी हे वक्तव्य करतोय असं नाही, तर माझ्यासमोर गांधींची प्रतिमा आहे. मी यांच्या हत्येचं उत्तर शोधण्यासाठी आलो आहे”, असेही ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, कमल हसनच्या या वक्तव्यानंतर भाजपनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गांधी हत्या आणि हिंदू दहशतवादाचा मुद्दा निवडणुकीत उपस्थित करणं निंदनीय आहे, असं ट्विट भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष तमिलसई यांनी केलं. अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी कमल हसन खेळी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी : कमल हसन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.