Amol Mitkari vs Bachhu Kadu : चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा फेकतो, बच्चू कडू अमोल मिटकरींवर कडाडले

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढले. भाजपने या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीही आपणच मोठी आघाडी ठरल्याचा दावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यमंत्री बच्चू […]

Amol Mitkari vs Bachhu Kadu : चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा फेकतो, बच्चू कडू अमोल मिटकरींवर कडाडले
Amol Mitkari_Bachhu Kadu
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 2:02 PM

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढले. भाजपने या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीही आपणच मोठी आघाडी ठरल्याचा दावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर भाजपच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. त्यावर बच्चू कडू यांनी आमिष घेतल्याचं सिद्ध करा, राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, चुलीत गेलं ते राजकारण असा हल्लाबोल केला.

आमिषाला बळी पडल्याचं सिद्ध करा, उद्या राजीनामा फेकतो, मला गरज नाही त्याची असं बच्चू कडू म्हणाले.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

महाविकास आघाडीची बेरीज भाजपपेक्षा सरस आहे. मात्र इथून पुढे सर्वांनी विशेषता महाविकास आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. स्वबळावर लढलो तर भाजपला यश मिळत राहील, महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे.

महाविकास आघाडी जर एकत्र आली नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण यश मिळवू शकणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

प्रहार या पक्षाला कुटासा या माझ्या गावात बच्चू भाऊंच्या पक्षाला फक्त ७८ मतं आहेत, आमच्या उमेदवारा ९५३ मतं आहेत. याचा अर्थ असा आहे, कामं केलं नसती तर मतं मिळाली नसती. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला. भाजपची मतं प्रहारने खेचली. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात फार मोठं यश मिळालं.

बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला. त्याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.

आगामी काळात महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र राहणं ठाम आहे, असं मिटकरींनी सांगितलं.

बच्चू कडू काय म्हणाले?

अमोल मिटकरी हा मोठा माणूस आहे. त्यांनी काय आरोप केला आहे तो मोठा माणूस आहे. मी आमिष घेणारी औलाद नाही. दबावाला बळी पडणारा मी नाही. तिथे भाजपचा उमेदवार होता, त्यांनी मला समर्थन कसं दिलं ते मला माहिती नाही. त्यामुळे आमिष दाखवणं, बळी पडणं हे बच्चू कडूंची औलाद नाही. त्यांनी सिद्ध करावं, मी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं. हवेतले आरोप करु नयेत, हे बंद करा, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू हे मोठे नेते आहेत, मी फक्त हेच म्हणतोय, बच्चू भाऊंसारखा नेता दिव्यांगाचं नेतृत्त्व करतात, भाजपसोबत ते कसं जाऊ शकतात हा माझा प्रश्न आहे, असं मिटकरी म्हणाले.

त्यावर बच्चू कडू म्हणाले, पेपरचं मला सांगू नका, कोणतं आमिष घेतलं हे सांगा, कोणता दबाव होता हे सांगा, हे बरोबर नाही, मी समजून घेतो म्हणजे काहीही बोलायचं का, मी सहन नाही करणार, चुलीत गेलं ते मंत्रिपद, अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही, तुम्ही महाविकास आघाडीत आहे की नाही याच्याशी मला देणंघेणं नाही, कोणतं आमिष दाखवलं ते सिद्ध करा, तुम्ही मला प्रश्न विचारु शकत नाही, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.

आमिष घेतलं हे बोलायचं कुठली पद्धत आहे, आमिषाला बळी पडणं म्हणजे काय असतं असे प्रश्न बच्चू कडू यांनी विचारले.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

भाजप शंभर टक्के निर्विवाद मोठा पक्ष आहे. हे मिटकरींनी मान्य करावंच लागेल, मिटकरींनी ते मान्य केलं त्याबद्दल धन्यवाद. अपवादात्मकपणे महाविकास आगाडी एकत्र आले. मतांची टक्केवारी पाहिली तर भाजपला सर्वाधिक मतं मिळाली. महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजप मोठं यश मिळेल हे अमोल मिटकरींनी मान्य केलं आहे.

सहा जिल्हा परिषदेत भाजपच्या जेवढ्या जागा होत्या, त्यापेक्षा जागा वाढल्या, मतं वाढली. पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात ताकद लावली होती, पण आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ताकद लावून ही निवडणूक लढली आणि मोठं यश मिळवलं.

खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाला छोट्या कार्यकर्त्यांने पाडलं. अनिल देशमुखांच्या जिल्ह्यातही स्थानिक कार्यकर्त्यांनी विजय मिळवला. पालकमंत्रीच यांच्यासोबत नाहीत त्यावरुनच यांच्यातील एकी दिसते.

नापास विद्यार्थ्यांनी आव आणू नये. २०-२०-२० मार्क मिळाले म्हणजे ६० टक्के होत नाहीत. यांच्यातील समन्वय नाही हे पुन्हा एकदा दिसतं. बच्चू कडूंना आम्ही काय आमिष दिलं? बच्चू कडूंवर हा आरोप अमोल मिटकरींना करायचा आहे का?

संबंधित बातम्या 

अमोल मिटकरींचा गावातच पराभव, बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ची धडाकेबाज एण्ट्री

अजितदादा, बच्चू कडूंना समज द्या, अमोल मिटकरींची मागणी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.